नागपंचमीच्या दिवशी सापाला पुजले जाते, मग इतर दिवशी का मारले जाते?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:47 AM2021-08-13T04:47:49+5:302021-08-13T04:47:49+5:30
------- जिल्ह्यात आढळणारे सापांचे प्रकार १) विषारी साप: जिल्ह्यात नाग, घोणस, फुरसे आणि मण्यार हे चारच प्रकारचे मुख्य विषारी ...
-------
जिल्ह्यात आढळणारे सापांचे प्रकार
१) विषारी साप: जिल्ह्यात नाग, घोणस, फुरसे आणि मण्यार हे चारच प्रकारचे मुख्य विषारी साप आढळतात, तर हरणटोळसह एक दोन प्रकारचे निमविषारी साप आढळून येतात.
२) बिनविषारी साप: जिल्ह्यात धामण, गवत्या, डुरक्या घोणस, कवड्या, तस्कर, पाणदिवड, मांजऱ्यासह इतर दोन चार प्रकारचे बिनविषारी साप आढळून येतात.
०००००००
साप हा तर शेतकऱ्यांचा मित्र
साप हा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा मित्र आहे. शेतात पिकांवर ताव मारणारे उंदीर, इतर किडे साप गिळंकृत करून शेतकऱ्यांची एकप्रकारे मदतच करतो. आपलेच भक्ष्य शोधण्यासाठीच साप शेतात संचार करीत असतो. तथापि, बहुतांश शेतकरी काळजी न घेता सापाला ठार करतात.
००००००००००००००००००००
साप आढळल्यावर काय करावे
१) सहसा अडगळीच्या जागा, भिंतीमधील छिद्रे, बिळे, घराभोवती पडलेल्या भगदाडात साप आश्रय घेतात.
२ ) साप आढळल्यानंतर त्याला न डिवचता, मारण्याचा प्रयत्न न करता सर्पमित्राला पाचारण करावे.
३) सापाला डिवचले तो चावा घेऊ शकताे. त्यामुळे आपल्या जिवाला धोका आहे. साप हा सहसा शांत वावरणारा जीव असल्याने त्याला सुरक्षीत पडून अधिवासात सोडावे.
----------
कोट: पावसाळ्याच्या दिवसांत सापांच्या बिळात पाणी शिरते. त्यामुळे त्यांचा जमिनीवर संचार वाढतो. सापांना ऐकू येत नाही. जमिनीच्या कंपनावरून ते अंदाज घेतात. सापाबाबत अनेक गैरसमज असल्याने त्याला मारण्याचा प्रयत्न अनेक जण करतात. सापांबाबत माहिती घेऊन त्यांना जीवदान देण्यासह जैवविविधतेचे संरक्षण करावे.
- गौरवकुमार इंगळे.
सर्पमित्र तथा मानद वन्यजीवरक्षक, वाशिम