वाशिमच्या तीनही मतदारसंघांत बंडखाेरीचे वारे! उमेदवार ठरलेत, नावे जाहीर करण्याची प्रतीक्षाच
By नंदकिशोर नारे | Published: October 26, 2024 12:37 PM2024-10-26T12:37:11+5:302024-10-26T12:39:24+5:30
निवडणुकीतील कळीचे मुद्दे कोणते, वाचा सविस्तर
जिल्हा वाशिम
नंदकिशाेर नारे, लोकमत न्यूज नेटवर्क, वाशिम: जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. तीनही मतदारसंघामध्ये इच्छुकांची गर्दी पाहता बंडखाेरीची दाट शक्यता असून, तशी तयारीही काहींनी चालविल्याने जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात सध्या बंडखाेरीचे वारे वाहत आहेत.
वाशिम व रिसाेडमध्ये महाविकास आघाडी आणि ‘वंचित’चे उमेदवार जाहीर झाले आहेत, तर कारंजामध्ये गाेपनीयता बाळगण्यात येत आहे. महायुतीमध्ये तिन्ही मतदारसंघातील उमेदवाराबाबत इच्छुकांची गर्दी पाहता निर्णय होऊ शकलेला नाही. इच्छुक असलेल्या काहींना उमेदवारी मिळणार नाही हे कळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. त्यामुळे महाविकास व महायुतीला यावेळी बंडखोरांचा सामना करावा लागणार हे निश्चित आहे.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
- जिल्ह्यातील औद्याेगिक विकासाचा मुद्दा तीनही मतदारसंघामध्ये कळीचा ठरु शकताे.
- शेतमालाला मिळत नसलेला भाव व पिक विमा रक्कम मिळण्यास दिरंगाई हा प्रश्न उपस्थित हाेऊ शकताे.
- वाशिम पाटबंधारे मंडळ कार्यालय शेगाव स्थानांतरण केल्याचा प्रश्न कळीचा ठरु शकताे
- जिल्ह्यात सिंचनासाठी माेठे प्रकल्प नाहीत. सिंचनाचा भार हा लघु प्रकल्पांवर आहे.
- जिल्हा हाेऊनही अद्याप शासकीय कार्यालय, रिक्त असलेल्या जागांचा कळीचा मुद्दा ठरू शकताे.
जिल्ह्यातील विधानसभांचे चित्र असे
विधानसभा मतदारसंघ मतदान विद्यमान आमदार पक्ष मिळालेली मते
वाशिम ५८% लखन मलिक भाजप ६६,१५९
कारंजा ६१% रिक्त (राजेंद्र पाटणी यांचे निधन) भाजप ७३,२०५
रिसाेड ६३% अमित झनक काॅंग्रेस ६९,८७५
हे उमेदवार झालेत जाहीर
जिल्ह्यात तीनही विधानसभा मतदारसंघामध्ये केवळ वाशिम व रिसाेड मतदारसंघात काही उमेदवार जाहीर झालेत. यामध्ये वाशिममध्ये महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी तर रिसाेडमध्ये काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा समावेश आहे.