भोकरखेड येथे आगीत सोयाबिनची सुडी जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 06:59 PM2019-11-06T18:59:06+5:302019-11-06T18:59:18+5:30
या घटनेत सुमारे ८० हजारांचे नुकसान झाल्याची तक्रार शेतकरी उद्धव लक्ष्मण खरात यांनी रिसोड पोलिसांत दाखल केली.
८० हजारांचे नुकसान : रिसोड पोलिसांत तक्रार दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड (वाशिम) : तालुक्यातील भोकरखेड शेतशिवारात रचून ठेवलेल्या सोयाबिनच्या सुडीला ६ नोव्हेंबरच्या रात्री कुण्यातरी अज्ञात व्यक्तीने आग लावून दिली. यामुळे सोयाबिन जळून खाक झाले. या घटनेत सुमारे ८० हजारांचे नुकसान झाल्याची तक्रार शेतकरी उद्धव लक्ष्मण खरात यांनी रिसोड पोलिसांत दाखल केली.
प्राप्त माहितीनुसार, शेतकरी खरात यांनी त्यांच्या भोकरखेड शेतशिवारातील सोयाबिनची सोंगणी करून सुडी रचून ठेवली होती. याव्दारे २० ते २५ क्विंटलचे उत्पन्न मिळणार होते; मात्र मंगळवारी रात्रीच्या सुमारास कुण्यातरी अज्ञात व्यक्तीने सोयाबिनच्या सुडीला आग लावून दिली. त्यात संपूर्ण सोयाबिन जळून खाक झाले. याप्रकरणी शेतकरी उद्धव खरात यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून महसूल व पोलिस विभागाच्या कर्मचाºयांनी घटनास्थळ गाठून नुकसानाचा पंचनामा केला.