सोशल मीडियावरील विकृती हा आजार!

By Admin | Published: June 12, 2014 11:02 PM2014-06-12T23:02:55+5:302014-06-12T23:09:02+5:30

‘लोकमत’ने निमंत्रित करून ‘सोशल मीडिया आणि सामाजिक वितुष्ट’ या विषयावर घडवून आणलेली ही परिचर्चा.

Social media disorder is a disease! | सोशल मीडियावरील विकृती हा आजार!

सोशल मीडियावरील विकृती हा आजार!

googlenewsNext

सोशल मीडियाच्या वापराने सध्या प्रत्येक जण स्वयंभू वार्ताहर बनत आहे. अभिव्यक्तीचा हुंकार सहजपणे तो व्यक्त करतो. त्याला कोणताही आडपडदा नाही, की कुणी सेन्सॉर नाही. तो आपल्या मनात सुरू असलेली घालमेल, भावभावनांची आंदोलने क्षणार्धात जगाच्या कॅन्व्हॉसवर उमटवू शकतो. त्याच्या मनात सुरू असलेल्या द्वंद्वाला क्षणार्धात प्रत्युत्तर व प्रतिसादही मिळतो. मग तो कधी सकारात्मक तर कधी नकारात्मकही असतो. या तंत्रज्ञानामुळे संवादात क्रांती झाली. संवादाने समाज जोडला जातो तसा तो सहज तोडण्याची व विध्वंस घडविण्याची मोठी शक्ती या माध्यमात असल्याचे आपण क्षणोक्षणी पाहतो आहे. लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा झालेला भलाबुरा वापर व त्याचे परिणाम सर्वांनी पाहिले आहेत. महापुरुषांच्या अवमानकारक पोस्टवरून गेल्या दोन आठवड्यांपासून देशात निर्माण झालेल्या अराजकसदृश परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर ह्यलोकमतह्णने तंत्रज्ञान, कायदा, सामाजिक उपक्रम, व्यापारी व मानसोपचारतज्ज्ञ यांच्यासह पोलीस अधिकार्‍यांना निमंत्रित करून ह्यसोशल मीडिया आणि सामाजिक वितुष्टह्ण या विषयावर बहुअंगाने घडवून आणलेली ही परिचर्चा. ह्यइंटरनेट हे शाप की वरदानह्ण हा वादविवादाचा विषय ठरतो आहे. पूर्वी महापुरुषांच्या पुतळ्यांची थेट विटंबना केली जायची. त्यावर पर्याय म्हणून आम्ही आमचे महापुरुष जाळी लावून कुलूपबंद केले. आता इंटरनेटच्या मृगजळाने वेढलेल्या जगात वाढलेल्या सायबर क्राईमला कसे कुलूपबंद करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सायबर क्राईमला र्मयादा नाहीत. त्याची अंगेही वेगवेगळी आहेत. मोबाईल व संगणकाच्या माध्यमातून जग अगदी तुमच्या समोर आले आहे. तुम्हाला काय हवंय आणि काय नाही, हा चॉईस व अधिकारही तुमचाच आहे. सध्या साध्या-साध्या पोस्टवरून समाजात वातावरण तंग होत आहे, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. नव्या माध्यमाचा सदुपयोग होतो, तसा दुरुपयोगही होत आहे. नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घ्यायला माणसांना काही अवधी हवा असतो. तसा या माध्यमांशीही तो विवेकाने जुळवून घेईल; परंतु सध्याच्या या माध्यमाच्या अविवेकी वापरामुळे समाजात हिंसक घटना घडत आहेत. सोशल माध्यमाच्या माहितीचा व बदलाचा वेगही प्रचंड आहे. सामाजिक, राजकीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व आर्थिक आदी सर्वच क्षेत्रांशी सोशल माध्यमांचा संबंध येतो. त्यामुळे या सर्वच क्षेत्रांतील प्रश्न या माध्यमामुळे निर्माण झाले आहेत. या प्रश्नावर आयटीचे अभ्यासक आश्‍वस्त आहेत. नको असलेल्या समाजविघातक ठरू शकणार्‍या बाबीवर सहज प्रतिबंध घालणे शक्य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे, तर माध्यम अभ्यासकांच्या मते या माध्यमावर आता तंत्रज्ञानाने बंधन घालणे अशक्य आहे. गुन्हेगारी ही वृत्ती असून ही वृत्ती घालविण्यासाठी समाजमनाचे प्रबोधन करावे लागणार आहे. मानसोपचारतज्ज्ञांना हा एक आजार वाटतो; परंतु कायद्याचे सातत्याने पुनर्विलोकन, कठोर अंमलबजावणी व शिक्षा होणे आवश्यक असल्याबद्दल सर्वांचेच एकमत होताना दिसते.

Web Title: Social media disorder is a disease!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.