सरनाईक महाविद्यालयात समाजकार्य संशोधन कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:31 AM2021-06-01T04:31:13+5:302021-06-01T04:31:13+5:30
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. जयश्री देशमुख होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.डॉ. प्रवीण वानखेडे (डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, ...
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. जयश्री देशमुख होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.डॉ. प्रवीण वानखेडे (डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, वर्धा) हे उपस्थित होते. आभासी कार्यशाळेत समाजकार्य संशोधन व व्याप्ती या विषयासंबंधी प्रा. वानखेडे यांनी मार्गदर्शन केले. संशोधन विषयाची निवड करण्यापूर्वी कुठल्या बाबींचा विचार करावा, जेणेकरून प्रभावी संशोधन कशापध्दतीने होईल? नमुना कोणता आणि कसा निवडावा, तथ्य संकलनाचे तंत्र आणि पध्दतीच्या संशोधनामध्ये कसा वापर करून आपले संशोधन समाजासाठी कसे परिणामकारक सिद्ध करू शकते, हे विविध उदाहरणांवरून स्पष्ट केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. देशमुख यांनी संशोधन करतेवेळी ‘नोंदणीचे महत्त्व व उपयोगीता’ याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच संशोधन विद्यार्थी दशेमध्ये किती महत्त्वाचे आहे. ही प्रक्रिया योग्य पध्दतीने समजावून घेणे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन केले. या एकदिवसीय अभासी कार्यशाळेचे आयोजन संशोधन समितीचे समन्वयक तथा विभागप्रमुख प्रा. किशोर वाहाणे, सदस्य प्रा. कीर्तने, प्रा. विजय वानखेडे यांनी केले. सूत्रसंचालन दीपक भालेराव, तर आभार प्रदर्शन रूपाली पंडित हिने केले. कार्यशाळेस डॉ. नीलेश देशमुख, डॉ. संजय साळीवकर, प्रा. पंडित नरवाडे, प्रा. वसंत राठोड, डॉ. संजय साळवे, डॉ. भारती देशमुख, प्रा. रवींद्र पवार, प्रा. दीपाली देशमुख, प्रा. प्रसेनजित चिखलीकर, प्रा. मंगेश भुताडे, प्रा. पंढरी गोरे, प्रा. जयश्री काळे, प्रा. गजानन बारड, प्रा. गजानन हिवसे यासह समाजकार्य स्नातक व पारंगतचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.