१३ गावातील ३२४२ शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 03:47 PM2018-11-04T15:47:24+5:302018-11-04T15:48:06+5:30
वाशिम: कृषी कल्याण अभियान कार्यक्रमांतर्गत मृदा आरोग्य पत्रिकांचे पहिल्या टप्प्यातील उद्दिष्ट पूर्ण केल्यानंतर दुसºया टप्प्यात २५ पैकी १३ गावांतील ३२४२ शेतकºयांना मृदा आरोग्य पत्रिकांचे वितरण कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: कृषी कल्याण अभियान कार्यक्रमांतर्गत मृदा आरोग्य पत्रिकांचे पहिल्या टप्प्यातील उद्दिष्ट पूर्ण केल्यानंतर दुसºया टप्प्यात २५ पैकी १३ गावांतील ३२४२ शेतकºयांना मृदा आरोग्य पत्रिकांचे वितरण कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
केंद्र शासनाने २०२२ पर्यंत शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने गतवर्षीपासून कृषी कल्याण अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. या अभियानांतर्गत शेतकºयांना योग्य वीज पुरवठा, शेती अवजारे, विविध कृषी योजनांचा लाभ देण्यासह मृदा आरोग्य पत्रिकांचे वितरण करण्यात येत आहे. रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर करुन कमी करुन मृद तपासणीवर आधारित, अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार खतांच्या संतुलित व परिणामकारक वापरास प्रोत्साहन देणे. मृद आरोग्य सुधारण्यासाठी तसेच मूलद्रव्यांची परिणामकारकता वाढविण्यासाठी जैविक खते, सेंद्रिय खते, गांडूळ खत, निंबोळी, सल्फर आच्छादित युरियासारख्या संथ गतीने नत्र पुरवठा करणाºया खतांच्या वापरास प्रोत्साहन देणे. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाद्वारे पिकांच्या उत्पादकतेत वाढ करणे, हा मृदा आरोग्य तपासणी व पत्रिका वितरणाचा उद्देश आहे. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात वाशिम जिल्ह्यातील २५ गावांतील शेतकºयांच्या शेतजमिनीतील मातीचे नमुने घेऊन शेतकºयांना मृदा आरोग्य वितरण करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. तर दुसºया टप्प्यात २५ गावांतील निर्धारित २०८८ माती नमुण्यांच्या उद्दिष्टापैकी १३ गावांतील १०९१ नमुण्यांचे संकलन करण्यात आले आणि ३२४२ शेतकºयांना मृदा आरोग्य पत्रिका वितरित करण्यात आल्या.