काेराेनामुळे टरबुजाचे मातीमाेल भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:43 AM2021-05-27T04:43:05+5:302021-05-27T04:43:05+5:30

दापुरा : काेराेना संसर्गामुळे काही तास वगळता बाजारपेठ बंद राहत असल्याने भरघाेस आलेले टरबुजाचे पीक येऊनही मातीमाेल भावात विकण्याची ...

Soil price of watermelon due to carina | काेराेनामुळे टरबुजाचे मातीमाेल भाव

काेराेनामुळे टरबुजाचे मातीमाेल भाव

Next

दापुरा : काेराेना संसर्गामुळे काही तास वगळता बाजारपेठ बंद राहत असल्याने भरघाेस आलेले टरबुजाचे पीक येऊनही मातीमाेल भावात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

दापुरा येथील युवा शेतकरी विश्वास गावंडे यांनी २ एकर टरबूज पिकाची लागवड करून मार्च महिन्यात कडाक्याचे तापमान असतानासुध्दा मेहनत घेऊन पिकाची निगा राखली. पीकही जोमात आले. परंतु महामारीमुळे अल्प काळच बाजारपेठ राहत असल्याने ३ रुपये किलाेच्यावर काेणी खरेदी करण्यास तयार नाही. स्वत: विकण्याचा विचार केला तर अल्प वेळेत विकणेही शक्य नसल्याने माेठ्या प्रमाणात नुकसान हाेत आहे. स्वत: विकण्याचा प्रयत्न केला असता १० ते २० रुपये नगाप्रमाणे टरबूज विकावे लागत असल्याने व संपूर्ण मालाची विक्री हाेत नसल्याने मजुरी, गाडी भाडेही निघत नसल्याचे वास्तव आहे. यामुळे टरबूज फेकून देण्याची वेळ आल्याचे विश्वास गावंडे यांनी सांगितले.

-----------------

Web Title: Soil price of watermelon due to carina

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.