माती परीक्षण, खरीप हंगामपूर्व शेतकरी प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:44 AM2021-04-02T04:44:02+5:302021-04-02T04:44:02+5:30

कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रविंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, ...

Soil testing, kharif pre-season farmer training | माती परीक्षण, खरीप हंगामपूर्व शेतकरी प्रशिक्षण

माती परीक्षण, खरीप हंगामपूर्व शेतकरी प्रशिक्षण

Next

कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रविंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रास्ताविकात तांत्रिक समन्वयक एस. के. देशमुख यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगून शेतकऱ्यांनी पुढील खरीप हंगामाच्या दृष्टीने माती परीक्षण नवीन वाण बीज प्रक्रिया याबाबतचे तांत्रिक ज्ञान अवगत करण्याचे आवाहन केले. कृषी विद्या शाखेचे प्रमुख टी. एस. देशमुख यांनी अत्यंत सोप्या पद्धतीने मातीचा नमुना घेण्याची पद्धत व त्यापासून होणारे फायदे याविषयी तांत्रिक विवेचन केले, तसेच पुढील खरीप हंगामात शेतकऱ्यांनी घरचे बियाणे वापरावे व बियाणे वापरताना उगवण शक्ती तपासावे याविषयीचा संदेश दिला. कार्यक्रमात उपस्थिताना शेती संबंधित अद्ययावत कृषी तंत्रज्ञान, तसेच हवामान अंदाज माहितीसाठी मोबाईल द्वारे व्हाट्सअ‍ॅप ग्रुपचा गावपातळीवर वापर करावा, याबद्दल देखील माहिती देण्यात आली.

Web Title: Soil testing, kharif pre-season farmer training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.