कारंजा, मानोरा तालुक्यातील २१ गावांच्या पाणी पुरवठा योजना आता सौर ऊर्जेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 02:32 PM2018-01-04T14:32:18+5:302018-01-04T14:37:16+5:30
कारंजा : भविष्यात विजेच्या प्रश्नातुन ग्रामपंचायतींचा पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी निकाली निघावा यासाठी मतदार संघातील जास्तीत जास्त पाणी पुरवठा योजना सौरउर्जेवर कशा करता येईल यासाठी आपण प्रयत्नशील असुन पहिल्या टप्प्यात मतदार संघातील २१ गावांचा समावेश करून त्या योजना मंजुर करून घेतल्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष आ.राजेंद्र पाटणी यांनी सांगितले.

ग्रामपंचायतीच्या योजना सौरउर्जेवर करण्यासाठी विद्युत मंडळाला मेडा मधुन तसेच जिल्हा नियोजनमधुन जास्तीत जास्त निधीसाठी प्रयत्न करण्यात येत आहे. याशिवाय मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या माध्यमातुन जास्तीत जास्त गावांचा समावेश करण्यासाठी व भविष्यात गरज भासल्यास जास्तीत जास्त विंधन विहिरी तसेच खासगी विहिरींचे अधिग्रहन करून दृष्काळग्रस्त भागांना टँकरव्दारे मुबलक पाणी पुरवठा कसा करता येईल या प्रयत्नात आपण असल्याचेही त्यांनी सांगितले. ग्रामीण भागात ग्राम पंचायतींकडे वीज देयकाची थकबाकी असल्यामुळे व वीजेच्या प्रश्नातुन सोडवणूक करण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर बसविण्यात याव्या अशी आपण चंद्रशेखर बावनकुळे यांचेकडे केली होती. त्या अनुषंगाने विभागीय महाव्यवस्थापक, महाउर्जा अमरावती यांनी सौर उर्जा पंपाकरिता वाशिम जिल्हा परिषद तसेच भुजल सर्वेक्षण विभागामार्पष्ठत सदर योजनेकरिता जिल्हा नियोजन समितीकडुन निधी उपलब्धतेबाबत निर्देश होते व संबंधित ग्रामपंचायत मार्पष्ठत प्रस्ताव देखील तातडीने पाठविण्याचे आदेश दिले होते.
कारंजा तालुक्यातील ग्राम इंझा, कामठवाडा, कार्ली, डोंगरगाव, गायवळ, धानोरा ताथोड, माळेगाव, पिंप्री वरघट, मोहगव्हाण, झोडगा, लाडेगाव, रामनगर, वडगाव इजारा, शिवण बु., पिंप्री मोडक, हिवरा लाहे आदी गावांचा समावेश. मानोरा तालुक्यातील ग्राम गव्हा, इंगलवाडी, चौसाळा, चोंढी, सोमनाथ नगर आदी गावांचा समावेश आहे.