पैनगंगा नदीवरील बॅरेजेस परिसरात उभारला जाणार सौरविद्युत प्रकल्प!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 03:12 PM2017-12-06T15:12:10+5:302017-12-06T15:17:09+5:30
वाशिम: जिल्ह्यातून वाहणाºया पैनगंगा नदीवरील बॅरेजस परिसरातील कृषिपंपांना वीज जोडणी देण्यासाठी सौरविद्युत प्रकल्प उभारणीच्या अनुषंगाने अधिकाºयांनी वाशिम तालुक्यातील पाच बॅरेजस प्रक्षेत्रांची संयुक्त पाहणी केली.
वाशिम: जिल्ह्यातून वाहणाºया पैनगंगा नदीवरील बॅरेजस परिसरातील कृषिपंपांना वीज जोडणी देण्यासाठी सौरविद्युत प्रकल्प उभारणीच्या अनुषंगाने खासदार भावना गवळी, आमदार लखन मलिक, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, महावितरणचे मुख्य अभियंता अरविंद भादीकर, अधीक्षक अभियंता विनोद बेथारीया, वाशिमचे तहसीलदार बळवंत अरखराव, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे, सहाय्यक कार्यकारी अभियंता एम. आर. काळे यांच्यासह महसूल, लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी वाशिम तालुक्यातील पाच बॅरेजस प्रक्षेत्रांची संयुक्त पाहणी केली.
वाशिम तालुक्यातील जुमडा, कोकलगाव, अडगाव, गणेशपूर व राजगाव बॅरेजेस प्रक्षेत्रांना यादरम्यान प्रत्यक्ष भेट देऊन सौरविद्युत प्रकल्पाला जमीन कशाप्रकारे उपलब्ध होऊ शकते, तसेच सौरविद्युत प्रकल्पाद्वारे किती शेतकºयांच्या कृषिपंपांना विद्युत जोडणी देता येणे शक्य होईल, याबाबत माहिती घेण्यात आली. सौरविद्युत प्रकल्प उभारणीसाठी बॅरेजस परिसरात शासकीय जमीन उपलब्ध होऊ शकेल का, याविषयी देखील यावेळी चर्चा करण्यात आली. बॅरेजस परिसरात सौरविद्युत प्रकल्प उभारणीविषयी सविस्तर अहवाल राज्यशासनाकडे सादर केला जाणार आहे. त्यानुषंगाने महावितरण आणि जलसंपदा विभागाकडून तसे प्रयत्न सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.