डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:27 AM2021-06-10T04:27:57+5:302021-06-10T04:27:57+5:30
यासंदर्भातील निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत बालरोग तज्ज्ञ डॉ. स्वप्नील हाके यांच्यावर काही ...
यासंदर्भातील निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत बालरोग तज्ज्ञ डॉ. स्वप्नील हाके यांच्यावर काही दिवसांपूर्वी एका इसमाने धारधार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. डॉ. हाके यांना यामुळे मोठा मानसिक धक्का बसला आहे. इतर डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांमध्येही या घटनेनंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून याबाबत विनाविलंब ठोस उपाययोजना करावी. कोविड नियंत्रण व उपचार कामात आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना अडचणी येत असून विविध पदे रिक्त असल्याने त्याचा ताण कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांवर येत आहे.
तथापि, साथरोग तज्ज्ञांची वेगळी समिती स्थापन करण्यात यावी, आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना एक अतिरिक्त वेतनवाढ व प्रोत्साहनपर भत्ता मंजूर करण्यात यावा, अधिकाऱ्यांना कोणतीही त्रुटी न काढता सरसकट निकषानुसार आश्वासित प्रगती योजना तत्काळ लागू करावी, जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना सेवानिवृत्तीतील वयोमर्यादा रद्द करून नवीन लोकांना संधी द्यावी, आदी मागण्या करण्यात आल्या. निवेदनावर संघटनेच्या जिल्हाध्यक्ष डॉ. नीना बोराडे, सचिव डॉ. अरविंद भगत, उपाध्यक्ष डॉ. राजेश डावरे, कोषाध्यक्ष डॉ. प्रसाद शिंदे, कार्याध्यक्ष डॉ. संतोष बोरसे यांच्यासह इतर डॉक्टरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.