अवकाळी पावसाने कही खुशी, कही गम..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 05:07 AM2021-05-05T05:07:31+5:302021-05-05T05:07:31+5:30
पाऊस अचानक आल्याने हळद उत्पादकांची तारांबळ उडाली, तर शेतातील उन्हाळी मूग, भुईमूग, ज्वारी या पिकांना या पावसाने बुस्टर दिल्याने ...
पाऊस अचानक आल्याने हळद उत्पादकांची तारांबळ उडाली, तर शेतातील उन्हाळी मूग, भुईमूग, ज्वारी या पिकांना या पावसाने बुस्टर दिल्याने एकंदरीत शेतकऱ्यांमध्ये ‘कही खुशी, कही गम’ दिसून येत आहे.
भर जहागीर परिसरामध्ये अनेक शेतकरी हे सिंचन तलाव विहिरीतील पाण्याच्या भरवशावर उन्हाळ्यातील तिसरे पीक घेण्याकडे वळले. परंतु सिंचनाचे योग्य नियोजन, पुरेशी साधने नसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील उन्हाळी मूग, भुईमूग, ज्वारीसारखी पिके ऐन बहरात आल्यानंतर एक-दोन पाण्याअभावी वाळण्याच्या स्थितीत होती. रविवारी सायंकाळी झालेला पाऊस या पिकांसाठी एक वरदान ठरल्याने अनेक शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण, तर हळद उत्पादक शेतकरी वर्गाची हळद भिजल्याने काही प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले.
०००
सोयाबीन, तूर पिकानंतर शेतकऱ्यांनी उन्हाळी ज्वारीची पेरणी केली; परंतु विहिरीचे पाणी कमी झाल्याने ज्वारी पीक ऐन बहरात आले असताना पाण्याची कमतरता जाणवली. कालच्या अवकाळी पावसाने पिकाची तहान भागविल्याने समाधान होत आहे.
बद्रिनायण गीत, शेतकरी भर जहागीर