कारंजा तालुक्यात ‘कही खुशी, कही गम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 09:21 AM2021-02-05T09:21:07+5:302021-02-05T09:21:07+5:30
कारंजा तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी झालेल्या मतदान प्रक्रियेत बेंबळा, कामरगाव, खेर्डा बु. भडशिवनी, शिवनगर, माळेगाव, हिंगणवाडी, सिरसोली, राहटी,मेहा, ...
कारंजा तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी झालेल्या मतदान प्रक्रियेत बेंबळा, कामरगाव, खेर्डा बु. भडशिवनी, शिवनगर, माळेगाव, हिंगणवाडी, सिरसोली, राहटी,मेहा, भामदेवी, लाडेगाव, पिंप्री मोडक, मोहगव्हान, शेवती, शेलू बु. कोळी, उंबर्डा बाजार, कार्ली, येवता, धामणी खडी, सोहळ, गायवळ, पिंपळगाव खु., सोमठाणा, रामनगर, दुधोरा तर मुंरबी हे अविरोध पार पडली. सरपंच पदासाठी निघालेल्या आरक्षणात भडशिवनी हे गाव माजी सभापती श्रीकृष्ण लाहे यांचे होते. ग्रामपचांयतीत त्यांच्याच गटाची सत्ता प्रस्थापित झाली; मात्र आरक्षण अनुसूचित जाती-जमातीसाठी निघाल्यामुळे पंचाईत झाली तर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत समजल्या जाणा-या उंबर्डा बाजार व कामरगाव हे सर्वसाधारणसाठी निघाल्यामुळे सर्वांसाठी सोयीस्कर झाले. तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व खुल्या प्रवर्गातील महिलांकरिता सरपंच पदाचे आरक्षणाची सोडत ही ४ फेब्रुवारी रोजी वाशिम येथे होणार असल्यामुळे अनेक बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरक्षणातील बदलामुळे कही खुशी, कही गमचे वातावरण दिसून येत आहे.