कधी पैशासाठी पाऊस, तर कधी पुत्रप्राप्तीसाठी भानामती; अंधश्रद्धेचे भूत कधी उतरणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:45 AM2021-08-25T04:45:48+5:302021-08-25T04:45:48+5:30

वाशिम : भूत उतरविण्याच्या बहाण्याने चमत्काराचा प्रयोग करीत लुबाडणूक करणे, कधी पैशासाठी पाऊस, तर कधी पुत्रप्राप्तीसाठी भानामती, कधी भोंदुबाबाकडून ...

Sometimes rain for money, sometimes Bhanamati for adoption; When will the demon of superstition come down? | कधी पैशासाठी पाऊस, तर कधी पुत्रप्राप्तीसाठी भानामती; अंधश्रद्धेचे भूत कधी उतरणार?

कधी पैशासाठी पाऊस, तर कधी पुत्रप्राप्तीसाठी भानामती; अंधश्रद्धेचे भूत कधी उतरणार?

Next

वाशिम : भूत उतरविण्याच्या बहाण्याने चमत्काराचा प्रयोग करीत लुबाडणूक करणे, कधी पैशासाठी पाऊस, तर कधी पुत्रप्राप्तीसाठी भानामती, कधी भोंदुबाबाकडून फसवणूक... असले अंधश्रद्धेचे प्रकार सर्वत्रच घडतात. जिल्ह्यात दोन, तीन असे प्रकार घडले आहेत. दरम्यान, कुणीही अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करीत, अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे जिल्ह्यात जनजागृती केली जाते.

विज्ञानाच्या विविध प्रयोगांच्या माध्यमातून काही भोंदुबाबा, मानसिक विकृतीचे इसम भानामतीच्या नावावर सर्वसामान्य जनतेवर अत्याचार करण्याबरोबरच आर्थिक लुबाडणूक करतात. यापासून नागरिकांनी वेळीच सावध होणे आवश्यक ठरत आहे.

०००००००००००००००

२०१३ मध्ये झाला कायदा

अंधश्रध्दाविरोधी विधेयकाच्या अनेक संज्ञा, शब्द बदलले, ढाचा बदलला, काही कलमांची छाटाछाटी झाली. १३ डिसेंबर २०१३ ला विधानसभेत, तर १८ डिसेंबर २०१३ ला विधानपरिषदेत हा अध्यादेश पास होऊन आता तो कायदा म्हणून अस्तित्वात आला. प्रत्येक उल्लंघनास कमीत कमी सहा महिने शिक्षा आणि जास्तीत जास्त सात वर्षांची शिक्षा असू शकते. ज्यात दंड ५००० ते ५०००० रुपयांपर्यंत आहे. हे गुन्हे अजामीनपात्र आणि दखलपात्र आहेत.

०००००००००००००००००००००

आठ वर्षांत २ गुन्हे दाखल

००००००

भोंदुगिरी करीत अंध भक्तांकडून पैशाची लुबाडणूक केल्याप्रकरणी कारंजा पोलीस स्टेशनला २०१२ मध्ये एका भेोंदुबाबाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

आठ वर्षांपूर्वी वाशिम तालुक्यातही भोंदुगिरीचा प्रकार घडला होता. अन्य काही तालुक्यांतही भानामती, भोंदुगिरीचे प्रकार घडले. परंतु, अधिकृत तक्रारी देण्यास कुणी पुढे आले नाही.

००००००००००००००

भानामतीवर विश्वास ठेवू नये!

कोट

भूत, भानामती, झटपट श्रीमंत होण्यासाठी कुणाचा तरी बळी देणे, पुत्रप्राप्तीसाठी बळी देणे आदी सर्व प्रकार अंधश्रद्धेचे आहेत. विज्ञानाच्या साहाय्याने भोंदुबाबा अंधश्रद्धा पसरवून सर्वसामान्यांची लूट करतात. अंधश्रद्धेवर कुणीही विश्वास ठेवू नये. जिल्ह्यात शाळा, महाविद्यालये यांसह विविध ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत जनजागृती केली जात आहे.

- विजय भड,

पदाधिकारी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, वाशिम.

०००००००००००

भानामती कसली,

हे तर खेळ विज्ञानाचे

म्हणे पैसे द्या अन् प्रश्न विचारा

२०१२ मध्ये कारंजा येथे एक भोंदुबाबा, १०० रुपये द्या आणि कोणत्याही तीन प्रश्नांची हमखास उत्तरे मिळवा, असे प्रलोभन देऊन भोळ्याभाबड्या नागरिकांची लुबाडणूक करीत होता. प्रश्नांची उत्तरे देताना पूजाअर्चा, भीती दाखवून आणखी पैशाची मागणी करीत होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्याचा भंडाफोड केला.

.........................

जिल्हाभरात जनजागृतीपर कार्यक्रम

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांतर्फे जिल्ह्यात अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत जनजागृती करण्यात येते. कुणीही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले जाते. पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणदेखील देण्यात आले आहे.

Web Title: Sometimes rain for money, sometimes Bhanamati for adoption; When will the demon of superstition come down?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.