सोमठाण्याचा पाणीपुरवठा महिनाभरापासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:26 AM2021-06-30T04:26:36+5:302021-06-30T04:26:36+5:30
गेल्या महिनाभरापासून सोमठाणा येथील नळ योजना नादुरुस्त असल्याने ग्रामस्थांना पाणी मिळणे कठीण झाले आहे. वारंवार सरपंच, सचिवांना याबाबत माहिती ...
गेल्या महिनाभरापासून सोमठाणा येथील नळ योजना नादुरुस्त असल्याने ग्रामस्थांना पाणी मिळणे कठीण झाले आहे. वारंवार सरपंच, सचिवांना याबाबत माहिती देऊन नळ योजना सुरू करण्याची विनंतीही करण्यात आली; परंतु त्यांनी आजवरही दखल घेतली नाही. त्यामुळे लोकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. यातून गावात जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे म्हणून गावातील महिला, लहान मुलीं, मुले शेतातील विहिरीवर पायपीट करून पाणी आणत आहेत.
-----------------
त्वरित दखल न घेतल्यास घागर मोर्चा
सोमठाणा येथील पाणीपुरवठा महिनाभरापासून ठप्प असताना ग्रामस्थांनी वारंवार मागणी करूनही ग्रामपंचायतीने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे महिला आक्रमक झाल्या असून, गटविकास अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घेऊन पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास घागर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.