जावई व प्रियकराने मिळून केली महिलेची हत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 07:33 PM2017-09-25T19:33:29+5:302017-09-25T19:35:28+5:30

वाशिम :  परभणी जिल्ह्यातील गव्हा येथील राईबाई त्र्यंबक घुगे या महिलेची डिसेंबर २०१६ मध्ये हत्या झाली होती. स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासामध्ये कैलास प्रल्हाद गंगावणे (जावई) व सुभाष तागड (मृतक महिलेचा प्रियकर) हे दोन आरोपी निष्पन्न झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. 

The son-in-law and the boyfriend murdered the woman | जावई व प्रियकराने मिळून केली महिलेची हत्या 

जावई व प्रियकराने मिळून केली महिलेची हत्या 

googlenewsNext
ठळक मुद्देराईबाई हिचा गळा आवळून हत्या केली व तिचा मृतदेह सोनाळा धरणामध्ये पायाला दगड बांधुन फेकुन दिलानऊ महिन्यानंतर गुन्हा उघडकीस दोन्ही आरोपी देपूळचे 

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम :  परभणी जिल्ह्यातील गव्हा येथील राईबाई त्र्यंबक घुगे या महिलेची डिसेंबर २०१६ मध्ये हत्या झाली होती. स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासामध्ये कैलास प्रल्हाद गंगावणे (जावई) व सुभाष तागड (मृतक महिलेचा प्रियकर) हे दोन आरोपी निष्पन्न झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. 
राईबाई त्र्यंबक घुगे (रा. गव्हा ता.जि. परभणी) ही महिला २८ डिसेंबर २०१६ रोजी देपूळ (ता.जि. वाशिम) येथे आपल्या जावयाच्या घरी आली होती. मुलगी व जावई यांच्यामध्ये वाद झाल्यामुळे नवरा-बायको यांच्यामधील वाद मिटविण्यासाठी राईबाई परभणी येथून आल्या होत्या. राईबाई घुगे हिचे देपूळ येथे जावयाकडे येणे जाणे असल्यामुळे सुभाष तागड याचेशी ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यामुळे दोघांमध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले. 
राईबाई घुगे हिने कालांतराणे प्रियकर सुभाष तागड याला ब्लॅकमेलींग करून पैशाची मागणी करीत होती. पैसे न दिल्यास आपले संबंध समाजात उजागर करेन अशी धमकीही दिली. यासह राईबाई घुगे हीच्याकडून जावई कैलास गंगावणे याला सुध्दा त्रास होता. आपल्या जावयाविरूध्द घुगे हिने तिच्या मुलीला पोलीसात तक्रारी देण्यास भाग पाडले होते. राईबाई घुगे हिच्या त्रासाला कंटाळून कैलास गंगावणे व सुभाष तागड यांनी संगनमत करून घुगे हिला कायमचे संपविण्याचा कट रचला. 
अखेर २८ डिसेंबर २०१६ रोजी जावई कैलास व प्रियकर सुभाष या दोघांनी राईबाई घुगे हिला आपल्याला एका महाराजांना भेटायला जायचे आहे. असे सांगुन किन्हीराजा जवळ असलेल्या सोनाळा धरणाजवळील वाघामाय मंदिरावर घेऊन गेले. त्याठिकाणी राईबाई हिचा गळा आवळून हत्या केली व तिचा मृतदेह सोनाळा धरणामध्ये पायाला दगड बांधुन फेकुन दिला. 
या घटनेचा तपास जऊळका पोलीसांकडून स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक प्रकाश डुकरे यांनी पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनात तपास पथक नेमले. या तपास पथकाने तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आरोपींचा छडा लावला. यामध्ये मृतक महिलेचा जावई कैलास गंगावणे व प्रियकर सुभाष तागड (दोघेही रा. देपुळ ता.जि. वाशिम) यांचा समावेश आहे. पोलीस पथकाने या दोन्ही आरोपीकडून मृतक महिलेच्या अंगावरील चोरलेले ७६ हजार रूपये किंमतीचे दागिने व एक मोटरसायकल जप्त केली. तपास पथकामध्ये सहाय्यक पोलीस निरिक्षक किरण साळवे, अजय वाढवे, कैलास इंगळे यांच्यासह पोलीस कर्मचाºयांचा समावेश होता. 
 

Web Title: The son-in-law and the boyfriend murdered the woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.