सौदीत राहणाऱ्या शेलूच्या सुपुत्रांचा कोरोना रुग्णांना मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 05:30 PM2021-05-03T17:30:27+5:302021-05-03T17:30:49+5:30
Washim News : औषधी व वाफ घेण्याचे यंत्र २५९ नागरिकांना पुरविले असून, यापुढेही खर्च करण्याचा संकल्प केला.
देपूळ ( वाशिम) : वाशिम तालुक्यातील शेलु बु. गावातील सौम्य व मध्यम लक्षणे असणाऱ्या कोरोना रुग्णांवर गावातच उपचार मिळावे या उद्देशातून शेलु बु. येथील सैनिक (जवान) एकवटले असून, कोरोनाबाधितांवरील उपचाराचा सर्व खर्च त्यांनी उचलला आहे. ही वार्ता सौदी अरेबियात राहणाºया शेलु येथील तिघांना समजताच, त्यांनीदेखील मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. औषधी व वाफ घेण्याचे यंत्र २५९ नागरिकांना पुरविले असून, यापुढेही खर्च करण्याचा संकल्प केला.
आपल्या गावातील नागरिकांना कोविडपासून वाचविण्यासाठी हीच वेळ आहे, या ऊद्देशाने प्रेरीत होऊन जन्मभूमिचे ऋण फेडन्यासाठी शेलू बु. येथील सैनिकांनी व ग्राम पंचायतने कोविड रूग्णांना गावातच मोफत ऊपचार देने सूरू केले आहे. याबाबत ‘लोकमत’ने २८ एप्रिल रोजी वृत्तही प्रकाशित केले. या कार्याची माहिती शेलु बु. येथील रहिवासी तथा व्यवसायासाठी सौदी अरेबिया येये गेलेल्या तिघांना मिळताच, मदतीसाठी ते देखील सरसावले आहेत. रविवार, २ मे रोजी ग्र्राम विकास अधिकारी राहुल उंद्रे यांच्यामार्फत औषधी तसेच वाफ घेण्यासाठी यंत्र देण्यात आले. सध्या औरंगाबाद येथे डॉ. राजाराम दमगिर यांनी गावातील जनतेच्या आरोग्यासाठी २१ हजार रुपये दिले असून सौदी अरेबियामध्ये राहणारे शेलु येथील रहिवासी किशोर उमाळे, राजू तडसे व शिवाजी उमाळे या तिघांनीदेखील प्रत्येकी १० हजार रुपये गावातील नागरिकांच्या आरोग्यासाठी आॅनलाईन पद्धतीने वळती केले आहेत.