सोनल प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’; सांडव्यावरून वाहतेय पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 11:52 AM2020-07-28T11:52:46+5:302020-07-28T11:53:03+5:30

या प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहत असल्याचे चित्र सोमवारी पाहायला मिळाले.

Sonal Project ‘Overflow’; Water flowing from the drain | सोनल प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’; सांडव्यावरून वाहतेय पाणी

सोनल प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’; सांडव्यावरून वाहतेय पाणी

Next

लोकमत न्युज नेटवर्क
शेलूबाजार : येथून जवळच असलेल्या सोनल प्रकल्पात यंदाच्या दमदार पावसामुळे जुलै महिना संपण्यापूर्वीच शंभर टक्के जलसाठा झाला असून, या प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहत असल्याचे चित्र सोमवारी पाहायला मिळाले. हा प्रकल्प काठोकाठ भरल्याने प्रकल्पालगत असलेल्या नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
सोनल प्रकल्प मालेगाव तालुक्यात येतो; परंतु शेलूबाजार परिसरातील शेतकऱ्यांना या प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी मिळते. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची नजर या प्रकल्पाच्या पातळीवर लागून होती. त्यात यंदा परिसरात दमदार पाऊस पडत असल्याने २३ जुलै रोजीच हा प्रकल्प १०० टक्के भरला आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे अडाण नदीकाठी असलेले सोनाळा, खेर्डा, गोगरी, हिरंगी, लाठी, शेलूबाजार, इचा, नागी, गावातील ग्रामस्थांना अतिदक्षकतेचा इशारा सोनल प्रकल्प शाखा अभियंता पांटबंधारे विभागाकडून देण्यात आला आहे. या प्रकल्पावर शेलूबाजार परिसरासह तालुक्यातील बहुतांश गावातील शेतकरी अवलंबूून आहेत. सोनल शंभर टक्के भरल्यास रब्बी हंगामातील हरभरा, गहू आदि रब्बी पिकांसोबतच खीरप हंगामातील तूर पिकाला आवश्यक वेळी पाणी मिळू शकते. रब्बी हंगामाकरिता पाणी मिळाल्यास शेलूबाजार बाजारपेठेला याचा मोठा फायदा होत असतो. धान्य बाजार बारमाही सुरु राहत असते त्यामुळे या भागातील शेतकºयांबरोबर मजुर वर्गाच्या हाताला मिळतो. सोनल प्रकल्प १०० टक्के भरल्यामुळे अडाण नदी व प्रकल्पावरुन उपसा सिंचन करणाºया शेतकºयांना ही याचा मोठा फायदा मिळणार आहे. त्यामुळेच शेलुबाजारसह या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या मालेगाव तालुक्यातील शेकडो शेतकºयांत आता आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 

Web Title: Sonal Project ‘Overflow’; Water flowing from the drain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.