सोनल प्रकल्प तहानलेलाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 08:22 PM2017-08-08T20:22:52+5:302017-08-08T20:24:46+5:30
शेलुबाजार (वाशिम) - अर्धा पावसाळा संपत आला असतानाही, दमदार पाऊस नाही. परिणामी, दोन हजार हेक्टरपेक्षा अधिक सिंचन क्षमता असणार सोनल प्रकल्प अद्याप तहानलेलाच आहे. या प्रकल्पात केवळ एक टक्का जलसाठा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
शेलुबाजार (वाशिम) - अर्धा पावसाळा संपत आला असतानाही, दमदार पाऊस नाही. परिणामी, दोन हजार हेक्टरपेक्षा अधिक सिंचन क्षमता असणार सोनल प्रकल्प अद्याप तहानलेलाच आहे. या प्रकल्पात केवळ एक टक्का जलसाठा आहे.
मालेगाव तालुक्यातील मध्यम प्रकल्प असलेल्या सोनल प्रकल्पात गतवर्षी याच सुमारास ८० टक्के जलसाठा होता. यावर्षी पावसात सातत्य नसल्याने तसेच प्रकल्प परिसरात दमदार पाऊस नसल्याने प्रकल्प तहानलेले असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. सोनल प्रकल्पातून दोन हजार हेक्टरपेक्षा अधिक जमिनीवर सिंचन केले जाते. यावर्षी प्रकल्पात केवळ एक टक्के जलसाठा असल्याने आणि पावसाने दीर्घ दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत.