कृषीपूरक व्यवसाय करून शेतकरी पुत्रांनी दाखविली युवकांना नवी दिशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:38 AM2021-03-08T04:38:36+5:302021-03-08T04:38:36+5:30
मानोरा तालुक्यातील नागरिकांचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन शेती असून मागील अनेक वर्षांपासून निसर्गाच्या असंतुलनामुळे अपेक्षित कृषी उत्पादन प्रचंड कष्ट करूनही ...
मानोरा तालुक्यातील नागरिकांचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन शेती असून मागील अनेक वर्षांपासून निसर्गाच्या असंतुलनामुळे अपेक्षित कृषी उत्पादन प्रचंड कष्ट करूनही शेतकऱ्यांच्या पदरी पडत नसल्याचे दुर्दैवी चित्र आहे.
अशाच स्थितीत वाईगौळ येथील युवा शेतकऱ्यांनी गीर गायीपासून उत्पादित देशी दूध, दही, तूप, लस्सी आणि मठ्ठा विक्रीचा व्यवसाय उभारत आर्थिक विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू केली असून, शेतकरी बांधव व युवकांनी नाउमेद न होता आपल्यातील कौशल्य विकसित करून शेतीला पूरक उद्योग व्यवसायाकडे वळत स्वतःचे, स्वतःच्या कुटुंबीयांसह देशाच्या समृद्धीत हातभार लावण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. रासायनिक खताच्या अतिवापरामुळे शेतीची प्रतवारी बिघडली असून शेतकऱ्यांनी आपल्याकडील गोधनाची संख्या वाढविल्यास दुग्ध उत्पादन आणि शेणखतामुळे कृषी उत्पन्नातही भरघोस वाढ होण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.