गरज संपताच नोकरीवरून काढण्याची हालचाल झाली सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:27 AM2021-06-26T04:27:52+5:302021-06-26T04:27:52+5:30
जिल्ह्यात ९ शासकीय कोविड केअर सेंटर स्थापन झाले होते. त्याठिकाणी रुग्णसेवेकरिता २१४ कंत्राटी कर्मचारी नियुक्त करण्यात आले. प्रत्येकी ३ ...
जिल्ह्यात ९ शासकीय कोविड केअर सेंटर स्थापन झाले होते. त्याठिकाणी रुग्णसेवेकरिता २१४ कंत्राटी कर्मचारी नियुक्त करण्यात आले. प्रत्येकी ३ महिन्यांचा करार संबंधित कर्मचाऱ्यांसोबत करण्यात आला. आता गरज संपल्यानंतर नोकरीवरून काढून टाकले जात असल्याने संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
..................
जिल्ह्यात किती कंत्राटी कर्मचारी घेतले
११२/२१४
११२/१४
...................
कोट :
कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात नऊ कोविड केअर सेंटर निर्माण करण्यात आले. त्याठिकाणी उपचार घेत असलेल्या रुग्णांची योग्यप्रकारे सुश्रूषा होण्यासाठी तीन महिन्यांचा करार करून कंत्राटी तत्त्वावर ‘स्टाफ’ भरण्याचे शासनाचे निर्देश होते. आता कोरोनाचे संकट ओसरू लागले असून रुग्णसंख्याही कमी झालेली आहे. यामुळे कंत्राटी ‘स्टाफ’ कमी करण्याची हालचाल सुरू आहे.
- डाॅ. मधुकर राठोड
जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम
................
गरज सरो, वैद्य मरो
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत कोविड केअर सेंटर रुग्णांच्या गर्दीने खचाखच भरलेले राहायचे. अशाही स्थिती स्वत:च्या जिवाची पर्वा न करता इमानेइतबारे सेवा दिली. आता नोकरीवरून कमी करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.
- प्रियंका थोरात
..........................
प्रत्येकी तीन महिन्यांचा करार करून कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती मिळाली होती. कोरोना संसर्गाचे संकट ओसरल्यानंतर नोकरीवरून काढून टाकले जाणार, याची कल्पना आहे. मात्र, आरोग्य खात्याने सकारात्मक विचार करावा.
- प्रज्ञा गायकवाड
............
कोरोना विषाणू संसर्गाचे संकट गेल्या काही दिवसांपासून ओसरू लागले आहे. त्यामुळे नोकरी जाणार, हे निश्चित आहे. आम्ही अनुभवी असल्याने आरोग्य विभागाने सकारात्मक विचार करून कायमस्वरूपी शासन सेवेत सामावून घ्यावे, अशी अपेक्षा आहे.
- प्रवीण थोरात