जनता कर्फ्यू संपताच वाशिमच्या बाजारपेठेत उसळली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 06:15 PM2020-09-23T18:15:38+5:302020-09-23T18:15:52+5:30

नागरिकांनी विविध वस्तू व साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली.

As soon as the public curfew ended, a crowd erupted in Washim's market | जनता कर्फ्यू संपताच वाशिमच्या बाजारपेठेत उसळली गर्दी

जनता कर्फ्यू संपताच वाशिमच्या बाजारपेठेत उसळली गर्दी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वाशिम शहरातील कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न म्हणून व्यापारी मंडळाने १६ ते २२ सप्टेंबर अशी सात दिवस बाजारपेठ बंद ठेवली. २३ सप्टेंबरपासून बाजारपेठ पूर्ववत होताच, नागरिकांनी विविध वस्तू व साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली. मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन झाले नाही तर अनेक व्यापाºयांनीदेखील ग्राहकांना दुकानात प्रवेश देताना आवश्यक ती खबरदारी घेतली नसल्याचेही दिसून आले.
जिल्ह्यात ‘अनलॉक-४’च्या टप्प्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वाशिम शहरातही सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने शहरवासियांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात आॅगस्टअखेर १७३५ कोरोनाबाधितांची संख्या होती. सप्टेंबर महिन्यात २२ दिवसात यामध्ये १९८९ रुग्णांची भर पडली. उपचारादरम्यान मृत्यूसंख्याही वाढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. आॅगस्टअखेर कोरोनाने ३० जणांचे बळी घेतले. सप्टेंबर महिन्याच्या २२ दिवसात यामध्ये आणखी ३९ जणांची भर पडली. ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने नागरिक वाशिम येथील बाजारपेठेत विविध वस्तू व साहित्याच्या खरेदीसाठी तसेच विविध कामानिमित्त शहरात येतात. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन, मास्कचा वापर होत नसल्याने तसेच गर्दी होत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न म्हणून व्यापारी मंडळ व युवा व्यापारी मंडळाने १६ ते २२ सप्टेंबर दरम्यान जनता कर्फ्यू पाळत बाजारपेठ बंद ठेवली. २३ सप्टेंबरपासून बाजारपेठ पूर्ववत होताच, सकाळपासूनच नागरिकांची वर्दळ वाढली. पाटणी चौकस्थित बाजारपेठेत नागरिकांसह वाहनधारकांची एकच गर्दी झाल्याने दुपारच्या सुमारास पाटणी चौकात काही वेळ वाहतुकही प्रभावित झाली होती. अनेक जणांनी मास्कचा वापर केला नाही तसेच फिजिकल डिस्टन्सिंगही पाळले नसल्याने कोरोनाचा संसर्ग आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: As soon as the public curfew ended, a crowd erupted in Washim's market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.