खरीप हंगामात पेरणीला सुरूवात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:50 AM2021-06-09T04:50:33+5:302021-06-09T04:50:33+5:30

यंदा मान्सून बऱ्यापैकी असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. गत चार, पाच दिवसात मालेगाव तालुक्यातील मुंगळा, रिसोड तालुक्यातील मांडवा, कुऱ्हा ...

Sowing begins in kharif season! | खरीप हंगामात पेरणीला सुरूवात !

खरीप हंगामात पेरणीला सुरूवात !

Next

यंदा मान्सून बऱ्यापैकी असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. गत चार, पाच दिवसात मालेगाव तालुक्यातील मुंगळा, रिसोड तालुक्यातील मांडवा, कुऱ्हा परिसरात बऱ्यापैकी पाऊस झाला. ७ जून रोजी कुऱ्हा, मांडवा परिसरात दमदार पाऊस झाल्याने शेतात पाणी साचले. गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून, काही ठिकाणी पाऊसही झाला. दमदार पाऊस झालेल्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीला देखील प्रारंभ केल्याचे दिसून येते. कुऱ्हा, मांडवा परिसरात ८ जून रोजी काही शेतकऱ्यांनी हळद लागवड केली. दरम्यान, दमदार पाऊस नसतानाही पेरणी केल्यास ही पेरणी अंगलट येऊ शकते, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. कमी-अधिक प्रमाणात पाऊस जरी पडला असला तरी शेतकऱ्यांनी सध्याच पेरणीची घाई करू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.

......

बॉक्स

४.६ मिमी पाऊस

गत २४ तासात जिल्ह्यात ४.६ मिमी पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली. रिसोड तालुक्यात ४.५ मिमी, मानोरा तालुक्यात सर्वाधिक २७.२ मिमी, कारंजा तालुक्यात १.७ मिमी पाऊस झाला. वाशिम तालुक्यात ०.१ मिमी पाऊस झाला. उर्वरित मालेगाव, मंगरूळपीर तालुक्यात पाऊस झाला नसल्याची नोंद घेण्यात आली.

००००००

Web Title: Sowing begins in kharif season!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.