खरीप हंगामात पेरणीला सुरुवात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:27 AM2021-06-10T04:27:20+5:302021-06-10T04:27:20+5:30
यंदा मान्सून बऱ्यापैकी असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. गत चार, पाच दिवसांत मालेगाव तालुक्यातील मुंगळा, शिरपूर, रिसोड तालुक्यातील मांडवा, ...
यंदा मान्सून बऱ्यापैकी असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. गत चार, पाच दिवसांत मालेगाव तालुक्यातील मुंगळा, शिरपूर, रिसोड तालुक्यातील मांडवा, कुऱ्हा परिसरात बऱ्यापैकी पाऊस झाला. ७ जून रोजी कुऱ्हा, मांडवा परिसरात दमदार पाऊस झाल्याने शेतात पाणी साचले. गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून, काही ठिकाणी पाऊसही झाला. दमदार पाऊस झालेल्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीलादेखील प्रारंभ केल्याचे दिसून येते. गत २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २७ मिमी पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली. सर्वाधिक पाऊस मानोरा तालुक्यात ३९ मिमी, तर सर्वांत कमी पाऊस कारंजा तालुक्यात १२ मिमी झाला. दरम्यान, दमदार पाऊस नसतानाही पेरणी केल्यास ही पेरणी अंगलट येऊ शकते, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. कमी-अधिक प्रमाणात पाऊस जरी पडला असला, तरी शेतकऱ्यांनी सध्याच पेरणीची घाई करू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.
......
बॉक्स
सरासरी २७ मिमी पाऊस
गत २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २७.५ मिमी पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली. वाशिम तालुक्यात २१.४ मिमी, रिसोड तालुक्यात २८.१० मिमी, मालेगाव तालुक्यात २२.६०, मंगरूळपीर तालुक्यात २१.५०, मानोरा तालुक्यात ३९.२०, तर कारंजा तालुक्यात १२.५० मिमी पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली.