पेरलेले बियाणे उगवलेच नाही ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 01:04 PM2019-06-29T13:04:15+5:302019-06-29T13:05:23+5:30

इंझोरी शिवारात महाबीजकडून घेतलेले सोयाबीन बियाणे उगवलेच नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Sown seed does not grow! | पेरलेले बियाणे उगवलेच नाही ! 

पेरलेले बियाणे उगवलेच नाही ! 

Next
ठळक मुद्दे शेतकºयांनी महाबीजकडून घेतलेल्या सोयाबीन बियाण्यांची पेरणी केली. आंतरपिक म्हणून तुरीची पेरणीही केली.तुरीचे बियाणे उगवले; परंतु सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क
इंझोरी (वाशिम) : जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाल्यानंतर शेतकरी उल्हासित झाला असतानाच त्याच्यावरील संकटाच्या मालिकेलाही सुरुवात झाली आहे. इंझोरी शिवारात महाबीजकडून घेतलेले सोयाबीन बियाणे उगवलेच नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे या शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.
यंदा मान्सून लांबल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. २२ जुनपर्यंतही मान्सूनचा पत्ताच नव्हता. त्यामुळे खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. वाशिम जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याची स्थिती सारखीच होती. त्यात मानोरा तालुक्याचाही समावेश होता. खरीपासाठी मशागत करून जमीन तयार केली असतानाही पावसाचा मागमुस नसल्याने शेतकºयांचे डोळे आकाशाकडे लागले होते. अखेर २२ जुनपासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर शेतकºयांनी खरीपाच्या पेरणीला वेगही दिला. यात मानोरा तालुक्यातील इंझोरी शिवारातील शेतकºयांनी महाबीजकडून घेतलेल्या सोयाबीन बियाण्यांची पेरणी केली. आंतरपिक म्हणून तुरीची पेरणीही केली. त्यातील तुरीचे बियाणे उगवले; परंतु सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही. जवळपास ८ शेतकºयांना या प्रकाराचा फटका बसला आहे. आता या संदर्भात शेतकºयांनी तालुका कृषी अधिकारी आणि महाबीजकडे तक्रार करून शेताची पाहणी करण्यासह नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. 
 
शेतकºयांकडून जमिनीतील बियाण्यांची पाहणी 
इंझोरी शिवारातील बहुतांश शेतकºयांनी महाबीजकडून घेतलेले सोयाबीन बियाणे पेरले आहे. आता ज्या शेतकºयांच्या शेतात सोयाबीन बियाणे उगवलेच नाही. ते शेतकरी शेतात पेरणीच्या सºया उकरून बियाण्यांचा शोध घेऊन नेमके काय घडले ते माहिती करण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसत आहेत. 

  शेतकºयांनी पेरलेले सोयाबीन बियाणे उगवले नसल्याची तक्रार अद्याप आपल्याकडे आलेली नाही. तथापि, इंझोरी शिवारात असा प्रकार घडला असेल, तर प्रत्यक्ष शेतांना भेटी देऊन पाहणी करू आणि वस्तूस्थितीनुसार शेतकºयांना नुकसान भरपाई किंवा मोबदला देण्याचा निर्णय घेऊ.
-डॉ. प्रशांत घावडे

Web Title: Sown seed does not grow!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.