सोयाबीन सडले; पण शासकीय खरेदीच नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 02:40 PM2019-10-30T14:40:01+5:302019-10-30T14:40:14+5:30
शासकीय खरेदी केंद्र सुरू होण्याच्या प्रतीक्षेत सोयाबीन घरीच ठेवले होते; परंतु खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
- राजरत्न सिरसाट
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: मूग, उडिदाचे पीक हातचे गेले असताना सर्व भिस्त सोयाबीन पिकावर होती. पावसामुळे सोयाबीनचेही प्रचंड नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिरावला आहे; परंतु अद्यापही शासकीय खरेदी केंद्र उघडण्यात आले नसल्याने जे काही अगोदर काढलेले सोयाबीन होते ते कवडीमोल दरात विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ आली आहे.
ज्या शेतकºयांनी जून महिन्यात सुरुवातीला पेरणी केली होती, त्यांनी सोयाबीन काढले आहे. अशा शेतकºयांचे प्रमाण अल्प असले तरी त्या शेतकºयांनी शासकीय खरेदी केंद्र सुरू होण्याच्या प्रतीक्षेत सोयाबीन घरीच ठेवले होते; परंतु खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. केवळ सोयाबीन खरेदीसाठीची आॅनलाइन नोंदणीची मुदत वाढवली असून, शेतकºयांना आता १५ नोव्हेंबरपर्यंत सोयाबीन व उडीद पिकांची नोंदणी करता येणार असल्याचे पणन व्यवस्थापकांकडून सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे सोयाबीनचा काढणी हंगाम सप्टेंबरमध्ये सुरू झाला. उडीद पिकाची तर त्यापूर्वीच काढणी झाली आहे; परंतु उडीद खरेदी केंद्रही सुरू झाले नाही. राज्यात यावर्षी ४० लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. दोन महिन्यांपासून पाऊस सुरू आहे. आठ दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने काढणीला आलेले सोयाबीन पाण्यात भिजले आहे. शेतात उभ्या असलेल्या सोयाबीनलाही कोंब फुटले असून, शेतात कोणतेच वाहन नेता येत नसल्याने काढून ठेवलेले सोयाबीन जागेवरच सडले आहे.
दरम्यान, शासकीय खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याने उडीद व सुरुवातीला काढलेले सोयाबीन बाजारात विकण्यात येत आहेत. तेथेही कवडीमोेल दरात खरेदी सुुरू आहे. शासनाने तातडीने खरेदी केंद्र सुरू करू न यावर्षी निकषात बदल करू न १२ टक्केऐवजी जास्त आर्द्रता असलेल्या शेमतालाची खरेदी करण्याची शेतकºयांची मागणी आहे.