सोयाबीन व उडीद पीक शेंगाविनाच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 07:37 PM2017-09-07T19:37:11+5:302017-09-07T19:38:09+5:30
वाशिम : शेतकºयांनी अतिशय मेहनत करुन मोठया श्रमातून पिकांना जिवनदान दिले. पावसामुळे पिके वाळू नयेत म्हणून ठिंबक सिंचनासह विविध प्रकारे पाणी देवून पीेके वाचविलीत. परंतु सोयाबीन व उडीद पीकाला शेंगाच न आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शेतकºयांनी अतिशय मेहनत करुन मोठया श्रमातून पिकांना जिवनदान दिले. पावसामुळे पिके वाळू नयेत म्हणून ठिंबक सिंचनासह विविध प्रकारे पाणी देवून पीेके वाचविलीत. परंतु सोयाबीन व उडीद पीकाला शेंगाच न आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मालेगाव तालुक्यातील ग्राम किन्हीराजा येथील शेतकºयांनी ७ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देवून पीकांची पाहणी करुन शेतकºयांना नुकसान भरपाई देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाव्दारे केली आहे.
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात गोवर्धन लोभा राठोड यांच्यासह किन्हीराजातील शेकडो शेतकºयांनी म्हटले की, २०१७ ते १८ दरम्यान गावातील शेतकºयांनी स्वत:च्या शेतामध्ये दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी सोयाबीन व उडीद पिकाची पेरणी पूर्ण केली. पेरणी करुन सोयाबीन व उडीद या पिकांची परिस्थिती फुलधारणा होईपर्यंत काही प्रमाणात समाधानकारक असतांना माल धारणा होण्याच्या परिस्थितीमध्ये अचानक नैसर्गीक वातावरणामुळे व कमी पावसाच्या अभावी व अतितीव्र उन्हाच्या किरणामुळे सोयाबीन व उडीद या पिकाला मालधारणा झालीच नाही. संबधीत अधिकाºयांना तातडीचे चौकशी आदेश देवुन चौकशी करुन त्वरित आम्हाला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली आहे. या निवेदनाच्या प्रती कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर , महसुल मंत्री प्रकाशकांत पाटील, पालकमंत्री संजय राठोड, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी , जिल्हा कृषी अधिकारी , तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, यांच्यासह संबधितांना देण्यात आल्या आहेत.