सोयाबीनची कमी दरात खरेदी; हमीभाव डावलला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 03:30 PM2019-10-30T15:30:54+5:302019-10-30T15:31:00+5:30
दिवाळीदरम्यान बाजार समित्या बंद असल्यानेही शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.
वाशिम : पश्चिम वºहाडात सोयाबीनची आवक वाढताच हमीभाव डावलून शेतकऱ्यांकडून कमी दराने सोयाबीन खरेदी केली जात आहे. दिवाळीदरम्यान बाजार समित्या बंद असल्यानेही शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.
यावर्षी पश्चिम वºहाडात जवळपास ११ लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. अल्प आणि अनियमित पावसामुळे सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट येत आहे. सोयाबीनला ३७१० रुपये प्रती क्विंटल, मूगाला ७०५० रुपये प्रती क्विंटल, उडदाला ५७०० रुपये प्रती क्विंटल असा हमीभाव आहे. बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक वाढण्यापूर्वी ३४०० ते ३९०० रुपयादरम्यान दर होते. सोयाबीनची आवक वाढताच बाजारभाव ३१०० ते ३६०० रुपयादरम्यान स्थिरावले आहेत. दिवाळीदरम्यान बाजार समित्या बंद असल्याने शेतकºयांना कमी दराने खासगी व्यापाºयांना सोयाबीन विकण्याची वेळ आली आहे. वाशिम जिल्ह्यात तर अजून नाफेडचे खरेदी केंद्रही सुरू झाले नाही. सध्या सोयाबीनला तीन हजारादरम्यान दर मिळत आहे. हा दर हमीभावापेक्षा ७०० रुपयाने कमी आहे. त्यामुळे एकप्रकारे शेतकºयांची आर्थिक लूट होत असल्याचे दिसून येते. हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदी करणाºयांविरूद्ध कठोर करवाई करावी, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.
हमीभावाने सोयाबीनची खरेदी करावी, अशा सूचना बाजार समिती प्रशासनाला दिलेल्या आहेत. शेतकºयांचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. वाशिम जिल्ह्यात नाफेडमार्फत हमीभाव खरेदी केंद्र सुरू होण्यासाठी संबंधितांकडे पाठपुरावा केला जार्ईल.
-रमेश कटके
जिल्हा उपनिबंधक, वाशिम