सततच्या पावसामुळे सोयाबीन पडले पिवळे; शेतकरी चिंतातूर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 04:08 PM2020-08-22T16:08:42+5:302020-08-22T16:08:58+5:30

सोयाबीन पिक पिवळे पडले असून, मुगाचेही नुकसान झाले.

The Soya beans turned yellow due to continuous rains; Farmers worried! | सततच्या पावसामुळे सोयाबीन पडले पिवळे; शेतकरी चिंतातूर!

सततच्या पावसामुळे सोयाबीन पडले पिवळे; शेतकरी चिंतातूर!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : मागील १४ दिवसात जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात सतत पाऊस झाला. यामुळे सोयाबीन पिक पिवळे पडले असून, मुगाचेही नुकसान झाले. सोयाबीन पिक पिवळे पडल्याने उत्पादनात घट तर येणार नाही ना? अशी भीती शेतकऱ्यांमधून वर्तविण्यात येत आहे. कृषी विभागाने यासंदर्भात मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. दरम्यान, शुक्रवार व शनिवार अशा दोन दिवसात पावसाने विश्रांती घेतल्याने शेती मशागतीची कामे पूर्ववत होत असल्याचे दिसून येते. पाणंद रस्त्यांवर चिखल झाल्याने गैरसोय होत आहे.
यावर्षी जिल्ह्यात जून महिन्यापासूनच बºयापैकी पाऊस पडत आहे. जिल्ह्यात तीन लाख ९६ हजार हेक्टरवर पेरणी झालेली आहे. आॅगस्ट महिन्यात ९ ते २० या दरम्यान संततधार पाऊस झाल्याने याचा सर्वाधिक फटका मूग पिकाला बसला. शेतातच शेंगा फुटत असल्याने उत्पादनात प्रचंड घट येण्याची भीती शेतकºयांनी वर्तविली. सततच्या पावसामुळे सोयाबीन पिक पिवळे पडत आहे. सोयाबीन पिक पिवळे पडणे हा आजार तर नाही ना? याबाबत कृषी विभागाने मार्गदर्शन करावे, अशी मागणीही शेतकºयांमधून होत आहे. नदी, नाल्याकाठच्या शेतात पाणी साचल्याने सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कपाशी आदी पिकांचे नुकसान झाल्याचे समोर येत आहे. दुसरीकडे जिल्ह्यात ‘अतिवृष्टी’ नसल्याचे कारण समोर करून संबंधित यंत्रणेने अद्याप पिकांचे पंचनामे केले नाहीत.


शेती मशागतीची कामे पूर्ववत
मागील १४ ते १५ दिवस सतत पाऊस असल्याने शेती मशागतीची कामे प्रभावित झाली होती. २१ आॅगस्टपासून पावसाने उघडीप दिल्याने किटकनाशक फवारणी, मूग सोंगणी यासह अन्य शेतीविषयक कामे पूर्ववत होत आहेत. पावसामुळे पाणंद रस्ते चिखलमय झाल्याने शेतात जाताना शेतकºयांची दमछाक होत आहे. पाणंद रस्त्यांचे खडीकरण, मजबूतीकरण करण्याची मागणी वेळावेळी करण्यात आली. परंतू, याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष दिले नसल्याने शेतकºयांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

Web Title: The Soya beans turned yellow due to continuous rains; Farmers worried!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.