सोयाबीन प्रक्रिया उद्योग उभारणीला प्राधान्य!

By admin | Published: October 8, 2016 02:19 AM2016-10-08T02:19:55+5:302016-10-08T02:19:55+5:30

२३५ कोटींच्या विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळय़ात मुख्यमंत्र्याची माहिती.

Soyabean processing industry priority! | सोयाबीन प्रक्रिया उद्योग उभारणीला प्राधान्य!

सोयाबीन प्रक्रिया उद्योग उभारणीला प्राधान्य!

Next

नंदकिशोर नारे / संतोष वानखडे
वाशिम, दि. 0७- पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकर्‍यांप्रमाणे विदर्भातील शेतकर्‍यांचा आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी सोयाबीनवर आधारित प्रक्रिया उद्योग उभारणी करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाशिम येथील शेतकरी मेळाव्यात दिली.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, शेतकर्‍यांचा आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी शेतमालाला समाधानकारक भाव मिळणे आवश्यक आहे. शेतमालाच्या बाजारभावातील ह्यदलालांह्णची साखळी तोडून टाकण्यासाठी शेतमालावर प्रक्रिया करणे गरजेचे आहे. शेतमालाला चांगला दर मिळवून देण्यासाठी शेतमाल प्रक्रिया उद्योग उभारणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने राज्य शासन प्रयत्न करीत असून, अमरावती येथे टेक्सटाइल पार्क निर्मितीमुळे कापसापासून कापडापयर्ंतची निर्मिती होत आहे. यामुळे एमआयडीसीमध्ये उद्योग वाढले असून, नवउद्योजकांना जागा कमी पडत आहे. कापसाला चांगला दर मिळत आहे. उद्योगाच्या माध्यमातून १५ ते २0 हजार युवकांना रोजगार उपलब्ध झाला. याप्रमाणेच सोयाबीनवर आधारित प्रक्रिया उद्योगाची उभारणी केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
संचालन किशोर गलांडे यांनी केले. यावेळी माजी आमदार विजय जाधव, भाजयुमोचे नेते राजू पाटील राजे, जिल्हा उपाध्यक्ष लखनसिंह ठाकूर, माजी जिल्हाध्यक्ष सुधाकर परळकर, सुरेश लुंगे, भीमकुमार जिवनानी, वसंतराव धाडवे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के.आर. गाडेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गावसाने, अपर जिल्हाधिकारी संजय बेडसे, वाशिम नगराध्यक्ष लता उलेमाले, कारंजा नगराध्यक्ष नीता गोलेच्छा, रिसोड नगराध्यक्ष यशवंत देशमुख, मंगरुळपीर नगराध्यक्ष चंदू परळीकर, यांच्यासह वाशिम नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश शेटे, भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

विकास कामांच्या लोकार्पणासाठी येणारे पहिलेच मुख्यमंत्री
यापूर्वी अनेक मुख्यमंत्री वाशिम जिल्ह्यात आले; मात्र ते मते मागण्यासाठी व पक्षांच्या कार्यक्रमासाठी आले, असे सांगून आमदार पाटणी म्हणाले, कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पणासाठी जिल्ह्यात येणारे देवेंद्र फडणवीस हे खर्‍या अर्थाने पहिले मुख्यमंत्री ठरले, असे पाटणी यांनी अभिमानाने सांगितले. यावेळी जनसमुदायातून टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.

Web Title: Soyabean processing industry priority!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.