सोयाबिनच्या उत्पन्नात ५० टक्क्याने घट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 08:17 PM2017-10-03T20:17:38+5:302017-10-03T20:18:02+5:30
वाशिम: कधीकाळी पिवळे सोने म्हणून विदर्भातील शेतकºयांच्या पसंतीस उतरलेल्या सोयाबिन पिकाने गत काही वर्षांमध्ये शेतकºयांचा पुरता भ्रमनिरास केला आहे. यंदा तर घटलेले पर्जन्यमान आणि विपरित हवामानामुळे सोयाबिनच्या सरासरी उत्पन्नात सुमारे ५० टक्के घट झाल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

जिल्ह्यातील प्रमुख पीक म्हणून सोयाबिनची ओळख असून खरीप हंगामात पेरणीलायक ४.५ लाख हेक्टर क्षेत्रापैकी निम्म्या क्षेत्रावर सोयाबिनचा पेरा असतो. असे असताना यावर्षी पावसाने वेळोवेळी दगा दिल्याने सोयाबिनची पुरेशी वाढ झाली नाही; तर काहीठिकाणी झाडांना शेंगाच लागल्या नसल्याचाही प्रकार घडला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये सद्या सोयाबिनची सोंगणी सुरू असून दरवर्षीच्या तुलनेत यंदा एकरी उत्पन्नात सरासरी ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट येत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.