शेतात रचून ठेवलेले सोयाबिन आगीत खाक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 07:30 PM2017-10-01T19:30:55+5:302017-10-01T19:31:53+5:30
करंजी (वाशिम): येथून जवळच असलेल्या ब्राम्हणवाडा खु. येथील शेतकरी बबन ग्यानुजी पवार यांच्या १ एकर ६० आर. शेतामधील सोयाबिनची सोंगणी करून रचून ठेवलेल्या सुडीला अचानक लागलेल्या आगीत सुमारे १.२० लाखांचे नुकसान झाले. या घटनेप्रकरणी २९ सप्टेंबरला रात्री पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क

यंदा घटलेले पर्जन्यमान आणि विपरित हवामानामुळे सोयाबिनच्या एकरी उत्पादनात कमालीची घट झाली आहे. अशा बिकट स्थितीत शेतकरी पवार यांनी हाती आलेल्या सोयाबिनची सोंगणी करून शेतात सुडी मारून ठेवली होती. २८ च्या रात्री तीला आग लागली. याप्रकरणी पवार यांनी शिरपूर पोलिसांत २९ सप्टेंबरला फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांकरवी पुढील तपास केला जात आहे.