सोयाबिन अनुदान प्रक्रिया थांबली: शेतकऱ्यांच्या चुकलेल्या बँक खात्यांचे ‘री-व्हेरीफिकेशन’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 02:58 PM2017-12-02T14:58:46+5:302017-12-02T15:00:33+5:30
वाशिम: गत खरीप हंगामात सोयाबिन विकलेल्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र, काही शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक चुकीचे आढळल्यामुळे तुर्तास ही प्रक्रिया थांबवून खात्यांचे ‘री-व्हेरीफिकेशन’ केले जात असल्याची माहिती येथील जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी दिली.

जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आॅक्टोबर ते डिसेंबर २०१६ या कालावधीत विक्री केलेल्या सोयाबीनला प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेवून त्यासाठी आवश्यक १४ कोटी ७९ लाख १३ हजार ५९४ रुपयांचा निधी जिल्ह्याला सुपूर्द केला. तो पात्र ४४ हजार ६१८ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये वर्ग करण्याची प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून राबविण्यात येत आहे. दरम्यान, १ डिसेंबरपर्यंत त्यापैकी निम्म्यापेक्षा अधिक शेतकºयांच्या खात्यात ७.५ कोटी रुपयांच्या आसपास रक्कम जमा देखील करण्यात आली. मात्र, उर्वरित काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये त्रुट्या आढळून आल्याने अशा खात्यांचे ‘री-व्हेरीफिकेशन’ करूनच नंतर रक्कम जमा केली जाईल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक कटके यांनी ‘लोकमत’ला दिली.