काजळेश्वरातील सोयाबीन उत्पादक नुकसानभरपाईचे प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:46 AM2021-05-25T04:46:20+5:302021-05-25T04:46:20+5:30

काजळेश्वर परिसरात काजळेश्वरसह उकरडा; पानगव्हान, जानोरी, उजळेश्वर, विराहित, खांदला, महागाव पारवा शिवारात येथील शेतकऱ्यांची शेती आहे. सिंचनाची प्रभावी सुविधा ...

Soybean growers in Kajleshwar await compensation | काजळेश्वरातील सोयाबीन उत्पादक नुकसानभरपाईचे प्रतीक्षेत

काजळेश्वरातील सोयाबीन उत्पादक नुकसानभरपाईचे प्रतीक्षेत

googlenewsNext

काजळेश्वर परिसरात काजळेश्वरसह उकरडा;

पानगव्हान, जानोरी, उजळेश्वर, विराहित, खांदला, महागाव पारवा शिवारात येथील शेतकऱ्यांची शेती आहे. सिंचनाची प्रभावी सुविधा नसल्याने खरीप हंगाम नैसर्गिक पावसाळी पावसावर अवलंबून असतो. अशा वेळी नैसर्गिक आपत्तीत सापडल्यास त्यासाठी शासनाने पंतप्रधान पीकविमा योजना अंमलात आणली. तिचा स्वीकार अनेक शेतकऱ्यांनी केला. गतवर्षी सोयाबीन सोंगणी काढणीच्या वेळी अवकाळी अतिवृष्टी झाली त्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले .नियमानुसार ७२ तासांचे आत फोटो माहिती ऑनलाइन

पीकविमा कंपनीला शेतकऱ्यांनी दिली. विमा कंपनी प्रतिनिधींनी पाहणी करून पंचनामे केलेत, मात्र अजूनही नुकसानभरपाईसाठी प्रचंड दिरंगाई बाळगली जात आहे. पिकांचा विमा उतरविल्यानंतर नुकसानीचा आधार तत्काळ शेतकऱ्यांना मिळावयास पाहिजे मात्र तसे होताना दिसत नाही. तेव्हा पीकविमा कंपनीने खरीप पेरणीपूर्व गतवर्षीच्या सोयाबीन पीक नुकसानीची अपेक्षित भरपाई रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खाती जमा करावी, अशी मागणी येथील शेतकरी हित संरक्षण समितीचे नितीन पा. उपाध्ये यांनी

बाधित शेतकऱ्यांच्या वतीने विमा कंपनीस केली आहे.

Web Title: Soybean growers in Kajleshwar await compensation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.