४0 हजार हेक्टरवरील सोयाबीन धोक्यात
By admin | Published: September 15, 2014 12:43 AM2014-09-15T00:43:23+5:302014-09-15T00:43:23+5:30
वाशिम जिल्ह्यातील १५ ते २0 टक्के सोयाबीनचे क्षेत्र प्रभावित.
संतोष मुंढे /वाशिम
जिल्ह्यातील शेतक-यांवरील संकट पिच्छा सोडायला तयार नाही. सोयाबीनची पेरणी झालेल्या एकूण क्षेत्रापैकी १५ ते २0 टक्के म्हणजे ४0 ते ५0 हजार हेक्टर क्षेत्राच्यावर सोयाबीनचे पीक विविध किडींच्या आक्रमनामुळे धोक्यात आले आहे. जिल्ह्यातील एकूण पेरणीयोग्य साडेचारलाख हेक्टर क्षेत्रापैकी जवळपास २ लाख ८८ हजार हेक्टर क्षेत्रावर चालु खरिप हंगामात सोयाबीनची पेरणी झालेली आहे. या संपूर्ण क्षेत्रावरील सोयाबीनच्या पीकापैकी काही भाग आधिच पिवळा मोझ्ॉक, मुळ खोड सड, शेंगा व खोडावरील करपा आदी रोगामुळे संकटात सापडला होता. या रोगातून शेतकरी वाट काढण्याचा प्रयत्न करीत असतांनाच शेतक-यांसमोर गत आठवड्यात सोयाबीनला हिरवी उंट अळी, एरंडीवरील उंटअळी, चक्रीभूंगा, केसाळ अळी, पाने खानारी अळी, स्पोडेप्टेरा व शेंगा पोखरणारी अळी या पिकाची पाने, कळ्य़ा फूले, व शेंगा खाणार्या किडींच्या प्रादुर्भावातून वाचविण्याचे नवे संकट उभे ठाकले आहे. सोयाबीनवर पांढरी माशी व तुडतूडे या रस शोषन करणार्या किडिंचा प्रादूर्भाव यापुर्विपासूनच सुरु आहे. त्यातच नव्याने झालेल्या किडिंच्या आक्रमणावर वेळीच नियंत्रण न आणल्यास शेतकर्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होण्याची भीती यासंदर्भातील जाणकार शेतक-यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान जिल्हा कृ षी अधिक्षक हिंदूराव चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जिल्ह्यातील किडींचा प्रादूर्भाव वाढत असल्याचे सांगीतले. कृषी विभाग विविध माध्यमातून शेतक-यांना किडींच्या नियंत्रणासाठी मार्गदर्शन करीत असल्याचे त्यांनी सांगीतले.