बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 07:51 PM2017-10-04T19:51:51+5:302017-10-04T19:52:23+5:30
वाशिम: जिल्ह्यात यंदा पिकलेल्या सोयाबीनची आवक बाजारात वाढत असल्याचे दिसत आहे; परंतु अपुºया पावसामुळे या शेतमालाच्या उत्पादनात मोठी घट येत आली असतानाच हमीभावापेक्षा खूप कमी दर बाजारात मिळत असल्याने शेतकरी निराश झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यात यंदा पिकलेल्या सोयाबीनची आवक बाजारात वाढत असल्याचे दिसत आहे; परंतु अपुºया पावसामुळे या शेतमालाच्या उत्पादनात मोठी घट येत आली असतानाच हमीभावापेक्षा खूप कमी दर बाजारात मिळत असल्याने शेतकरी निराश झाले आहेत.
वाशिम जिल्ह्यात यंदा पावणे दोन लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली. तथापि, विपरित हवामान आणि अपुºया पावसामुळे या पिकाच्या उत्पादनात प्रचंड घट आली असून, एकरी दोन क्विंटलही सोयाबीनचे उत्पादन होत नसल्याचे अनेक ठिकाणी दिसत आहे. आता सणउत्सवाच्या काळात आपल्या गरजा भागविण्यासह रब्बी हंगामाच्या तयारीसाठी शेतकरी सोयाबीन विकण्यासाठी बाजारात येत असल्याने या शेतमालाची आवक वाढत असल्याचे चित्र जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये पाहायला मिळत आहे. कारंजा बाजार समितीमध्ये सोयाबीनची मंगळवारी सहा हजार क्विंटल आवक झाली होती. त्याशिवाय, वाशिम, मंगरुळपीर आणि रिसोड येथेही यंदाच्या सोयाबीनची मोठी आवक होत असल्याचे बाजार समित्यांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे; परंतु या पिकाचे उत्पादन घटल्यामुळे आधीच शेतकरी अडचणीत असताना बाजारात या शेतमालास अपेक्षेपेक्षा खूपच कमी भाव मिळत आहे. शासनाने यंदा सोयबीनसाठी ३ हजार ५० रुपये प्रति क्विंटलचे हमीदर घोषीत केले असताना बाजारांत केवळ २५ ते २८ रुपये प्रति क्विंटल दराने शेतकºयांना भाव मिळत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग निराश झाला आहे.