सोयाबीनचे भाव आणखी गडगडले; शेतकरी धास्तावले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 06:50 PM2021-09-18T18:50:53+5:302021-09-18T18:51:27+5:30
Washim APMC : नवीन सोयाबीनला ५५०० ते ७२०० रुपये प्रती क्विंटल असा दर मिळाला.
वाशिम : नवीन सोयाबीन मार्केटमध्ये येताच बाजारभाव गडगडत आहेत. यामध्ये आणखी घट येत असून, शनिवार, १८ सप्टेंबर रोजी वाशिमच्या बाजार समितीत नवीन सोयाबीनला ५५०० ते ७२०० रुपये प्रती क्विंटल असा दर मिळाला. जून्या सोयाबीनचे दरही कोसळले असून, ६०००-७४०० रुपये प्रती क्विंटल भाव मिळाला.
शेतकºयांना दरवर्षीच विविध संकटातून जावे लागते. नैसर्गिक आपत्तीपासून बचावलेला शेतमाल चिखलमय रस्त्याने घरी आणताना शेतकºयांची दमछाक होते. शेतमाल घरी आला की बाजारभाव गडगडतात. १५ दिवसांपूर्वी जून्या सोयाबीनला १० हजारावर भाव होते. त्यानंतर बाजारभाव गडगडत असल्याचे दिसून येते. नव्या सोयाबीनला तर अल्प भाव मिळत असल्याचे दिसून येते. ४ सप्टेंबरला नव्या सोयाबीनला प्रती क्विंटल ६७०० ते ८२८१ रुपये भाव मिळाला होता. आता बहुतांश शेतकºयांच्या घरात सोयाबीन येत असल्यामुळे बाजारभावही कोलमडत असल्याचे दिसून येते. शनिवारी वाशिम बाजार समितीत नवीन सोयाबीनची २७७५ क्विंटल आवक होती. या सोयाबीनला प्रती क्विंटल ५५००-७२०० भाव मिळाला. जून्या सोयाबीनची आवक ३७९ क्विंटल होती तर प्रती क्विंटल भाव ६०००-७४०० होता. यावरून सोयाबीनच्या बाजारभाव प्रचंड घट येत असल्याचे दिसून येते. बाजारभाव गडगडत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत.