सोयाबीन पाठोपाठ तीळ, भुईमूग शेंगा खाताहेत भाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:47 AM2021-09-15T04:47:43+5:302021-09-15T04:47:43+5:30

०००००००००००००००० भुईमुगावर २० हजारांचा खर्च, यंदा पैसा वसूल भुईमुगाच्या पेरणीपासून ते पीक हाती येईपर्यंत शेतकऱ्यांना साधारणत: २० हजार रुपये ...

Soybeans are followed by sesame and groundnuts. | सोयाबीन पाठोपाठ तीळ, भुईमूग शेंगा खाताहेत भाव!

सोयाबीन पाठोपाठ तीळ, भुईमूग शेंगा खाताहेत भाव!

Next

००००००००००००००००

भुईमुगावर २० हजारांचा खर्च, यंदा पैसा वसूल

भुईमुगाच्या पेरणीपासून ते पीक हाती येईपर्यंत शेतकऱ्यांना साधारणत: २० हजार रुपये एकरी खर्च येतो. त्यात एकरी ३३०० रुपये प्रतिक्विंटलच्या तीन बॅग बियाणे टाकाव्या लागतात. या पिकाला रानडुक्कर, हरीण आणि माकडांपासून अधिक धोका असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना जीव धाेक्यात घालून दिवसा आणि रात्री पिकाची रखवाली करावी लागते. यंदा या पिकाला चांगले दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा खर्च वसूल होत आहे.

००००००००००००००००००

सोयाबीन, तीळ बरोबरीत

प्रमुख तेलवाण म्हणून ओळख आणि वापर असलेल्या सोयाबीनचे दर यंदा ११ हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते. अद्यापही या शेतमालास सरासरी ९ हजार रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळत आहेत. या शेतमालाने तुलनेत अधिक महत्त्व असलेल्या तिळाची बरोबरी साधली आहे. तिळाला बाजारात ९३०० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळत आहेत.

००००००००००००००००००००

कोट: उन्हाळी हंगामात आम्ही दरवर्षी भुईमुगाची पेरणी करतो. अपेक्षित दर मात्र मिळत नाहीत. साधारण ४५०० ते ५२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचे दर भुईमूग शेंगांना मिळायचे. त्यात गतवर्षी उत्पादन घटले, पण भुईमुगाचे दर वाढल्याने खर्च वसूल होणार आहे.

-निलेश पवार,

भुईमूग उत्पादक शेतकरी

----------

कोट: भुईमुगाचे पीक घेणे सोपे नाही. त्यात या पिकाला अपेक्षित दरही मिळत नाही आणि जिल्ह्यात सर्वच बाजारात खरेदीही होत नाही. त्यामुळे अडचणी येतात. खर्चही निघणे कठीण होते. आता यंदा भुईमुगाच्या शेंगांना ५४०० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळत असल्याने समाधान वाटते.

-हिरामन ठोक,

भुईमूग उत्पादक शेतकरी

००००००००००००००००००००००

जिल्ह्यात उन्हाळी गळीत पिकांचे क्षेत्र

भुईमूग ५७८६ हेक्टर

तीळ - २१८

सोयाबीन ५३,

इतर - २६१

Web Title: Soybeans are followed by sesame and groundnuts.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.