सोयाबीनच्या दराने गाठला ३४३० चा टप्पा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 03:04 PM2018-11-28T15:04:37+5:302018-11-28T15:10:43+5:30
वाशिम : मागील १५ दिवसांच्या तुलनेत २७ नोव्हेंबर रोजी वाशिम बाजार समितीत सोयाबीनच्या प्रति क्विंटल भावाने ३४३० रुपयांचा टप्पा गाठला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : मागील १५ दिवसांच्या तुलनेत २७ नोव्हेंबर रोजी वाशिम बाजार समितीत सोयाबीनच्या प्रति क्विंटल भावाने ३४३० रुपयांचा टप्पा गाठला आहे. सोयाबीनच्या दरातील वाढ ही शेतकºयांसाठी फायद्याची ठरत आहे.
दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणाची शिकार ठरलेल्या शेतकºयांना यावर्षीदेखील खरिप हंगामात निसर्गाची पूर्णपणे साथ मिळाली नाही. यामुळे सोयाबीनसह मूग, उडदाच्या उत्पादनात घट आली. २५ आॅक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान अल्पभूधारक व मध्यमवर्गीय शेतकºयांना दैनंदिन व्यवहाराबरोबरच दिवाळीच्या बाजारासाठी सोयाबीनची विक्री करणे आवश्यक होते. त्यादरम्यान सोयाबीनचे बाजारभाव प्रति क्विंटल २३०० ते २९०० रुपयांदरम्यान होते. आर्थिक गरज भागविण्यासाठी शेतकºयांनी त्यावेळी मातीमोल भावाने सोयाबीनची विक्री केली. २० दिवसाच्या कालावधीत आता सोयाबीनच्या बाजारभावात दिवसेंदिवस वाढ होत असून, २७ नोव्हेंबर रोजी वाशिम बाजार समितीत सोयाबीनचे दर प्रति क्विंटल ३४३१ रुपयांपर्यंत पोहचले होते. हमीभावापेक्षा जादा दर मिळत असल्याने आवकही वाढली असल्याचे दिसून आले.
शेतमालाची प्रतवारी,दर्जानुसार प्रति क्विंटल भाव दिला जातो. सध्या सोयाबीनला ‘अच्छे दिन’ येत आहेत. वाशिम बाजार समितीत २७ नोव्हेंबर रोजी सोयाबीनला ३३११ ते ३४३१ रुपये असा दर होता.
- चरण गोटे
मुख्य प्रशासक,
कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशिम