मालेगावात उभ्या होताहेत प्रशस्त प्रशासकीय इमारती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 02:54 PM2018-06-13T14:54:31+5:302018-06-13T14:54:31+5:30
मालेगाव (वाशिम) : तालुका मुख्यालय असलेल्या मालेगाव येथे गेल्या काही महिन्यांपासून कोट्यवधी रुपये निधी खर्चून भव्यदिव्य स्वरूपात प्रशस्त प्रशासकीय इमारती आकार घेत असल्याचे दिसून येत आहे.
मालेगाव (वाशिम) : तालुका मुख्यालय असलेल्या मालेगाव येथे गेल्या काही महिन्यांपासून कोट्यवधी रुपये निधी खर्चून भव्यदिव्य स्वरूपात प्रशस्त प्रशासकीय इमारती आकार घेत असल्याचे दिसून येत आहे. या उपलब्धींमुळे शहर विकासात मोलाची भर पडणार असल्याचा सूर येथे उमटत आहे.
मालेगाव शहरासह तालुक्यातील विकासकामे गेल्या काही महिन्यांपासून प्रगतीपथावर आहेत. त्यात प्रामुख्याने पंचायत समितीची नवीन प्रशासकीय इमारत, जैन समाज बांधवांचे भवन यासह मालेगाव तहसील कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा समावेश आहे. तालुक्यातील शिरपूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची कोट्यवधी रुपयेची इमारत, दुय्यम निबंधक कार्यालय, रिसोड फाटा ते बसस्टँडपर्यंतचा रस्ता, श्री क्षेत्र डव्हा फाटा ते मंदिरापर्यंतचा रस्ता यासह विद्युत उपकेंद्राच्या कामालाही गती देण्यात आली आहे. तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीस ५ कोटी ६० लाख रुपये खर्च लागणार असून सद्या हे काम प्रगतीपथवार आहे.