मालेगाव तहसीलची विशेष मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 05:01 AM2021-02-23T05:01:31+5:302021-02-23T05:01:31+5:30
........... ‘भारत नेट’ची कामे संथ गतीने वाशिम : भारत नेट योजनेअंतर्गत ग्रामपंचायतींना हाय स्पीड इंटरनेट सेवा पुरविण्याचे शासनाचे आदेश ...
...........
‘भारत नेट’ची कामे संथ गतीने
वाशिम : भारत नेट योजनेअंतर्गत ग्रामपंचायतींना हाय स्पीड इंटरनेट सेवा पुरविण्याचे शासनाचे आदेश आहेत; मात्र इंटरनेट जोडणीची कामे संथ गतीने सुरू असल्याने ग्रामीण भागातील इंटरनेट सेवा वारंवार ठप्प होत असून कामकाज खोळंबत आहे.
................
पीडित व्यक्तींच्या पुनर्वसनाची मागणी
वाशिम : अॅट्रॉसिटी पीडित व्यक्तींना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशा प्रकरणात हत्या झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील व्यक्तीला नोकरी द्यावी, त्यांचे पुनर्वसन करावे, आदी मागण्यांचे निवेदन नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीसचे राज्य सहसचिव पी.एस. खंदारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे शुक्रवारी सादर केले.
................
रस्त्याची दुरुस्ती; वाहनचालकांना दिलासा
वाशिम : शहरातील पोस्ट ऑफिस चौकापासून पुसद नाक्यापर्यंतच्या मुख्य रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे. यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला असून वाहतूक सुरळीत झाल्याचे दिसत आहे.
...................
कारवाईच्या धास्तीने ‘मास्क’चा वापर वाढला
वाशिम : गत काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ व्हायला लागली आहे. यामुळे मध्यंतरी मास्क वापरास टाळाटाळ करणाऱ्या नागरिकांनी आता मात्र मास्कचा गांभीर्याने वापर करणे सुरू केल्याचे दिसत आहे.
.................
उपकेंद्रांची कामे रखडली
वाशिम : सेनगाव (जि. हिंगोली) येथील १३२ के.व्ही. पॉवरहाउसमधून विद्युत प्रवाह घेण्यासाठी लाइन टाकण्याचा प्रश्न प्रलंबित असल्याने दोन विद्युत उपकेंद्रांची कामे रखडली आहेत. यामुळे पैनगंगा नदीच्या काठावरील शेतकऱ्यांना सिंचनात अडथळा जाणवत आहे.
.............
मुख्य महामार्गावर साहित्य विक्री
वाशिम : शहरातून गेलेल्या महामार्गाच्या कडेला बसून गॅस शेगडी, खेळणी आदी साहित्य विक्रीचा व्यवसाय केला जात आहे. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून शहर वाहतूक विभागाने याकडे लक्ष पुरवावे, अशी मागणी धनंजय पाईकराव यांनी गुरुवारी निवेदनाद्वारे केली.