उमेदवारांच्या निवडणूक खर्च संनियंत्रणावर विशेष भर! - नरेंद्र सिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 05:05 PM2019-10-05T17:05:14+5:302019-10-05T17:05:31+5:30

उमेदवारांकडून केल्या जाणाऱ्या खर्चावर संनियंत्रण ठेवण्यासह त्यासाठी गठीत केलेल्या विविध पथकांवर ते बारकाईने लक्ष ठेवून असणार आहेत.

Special emphasis on monitoring the election expenses of candidates! - Narendra Singh | उमेदवारांच्या निवडणूक खर्च संनियंत्रणावर विशेष भर! - नरेंद्र सिंग

उमेदवारांच्या निवडणूक खर्च संनियंत्रणावर विशेष भर! - नरेंद्र सिंग

Next

वाशिम : आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या १५ दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यासाठी भारतीय नागरी लेखा सेवेतील (आयसीएस) सन २०१५ च्या तुकडीतील अधिकारी नरेंद्र सिंग यांची निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून नेमणूक झाली आहे. निवडणूकीदरम्यान उमेदवारांकडून केल्या जाणाऱ्या खर्चावर संनियंत्रण ठेवण्यासह त्यासाठी गठीत केलेल्या विविध पथकांवर ते बारकाईने लक्ष ठेवून असणार आहेत. यासंबंधी तसेच तत्सम विषयांबाबत त्यांच्याशी साधलेला हा संवाद...

प्रश्न - निवडणूकीत होणाºया गैरप्रकारांबाबत काय सांगाल?
उत्तर - विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारांकडून मतदारांना मद्य, पैसे अथवा इतर वस्तंूचे प्रलोभन देवून त्यांच्यावर प्रभाव टाकला जावू शकतो. असे गंभीर प्रकार टाळण्यासाठी निवडणूक खर्च संनियंत्रण करणे आवश्यक ठरते. त्यासाठी जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघात पथकांचे गठण करण्यात आले आहे. यामाध्यमातून निवडणूक प्रक्रिया पारदर्शी व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जाणार आहेत.

प्रश्न - उमेदवारांच्या खर्चावर संनियंत्रणासाठी कुठल्या उपाययोजना केल्या आहेत?
उत्तर - विधानसभा निवडणुकीत कोणत्याही उमेदवारांकडून मतदारांना कोणत्याही प्रकारचे प्रलोभन दाखविले जावू नये, यासाठी सर्व फिरत्या पथकांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्टार प्रचारकांच्या सभा, रॅलीमध्ये उमेदवारांकडून होणाºया खचार्ची व्यवस्थित नोंद होण्यासाठी व्हिडीओ संनियंत्रण पथकांनी विशेष काळजी घेणे. सभा, रॅलीमधील प्रत्येक वस्तू, वाहनांचे रेकॉर्डिंग कॅमेरामध्ये करणे. लेखांकन पथकाने उमेदवाराचा खर्च काळजीपूर्वक शॅडो रजिस्टरमध्ये नोंदविला जाईल, याची दक्षता घेणे. सर्व पथकांनी विहित कालावधीत व विहित नमुन्यात नियमितपणे आपले अहवाल सादर करणे, आदी स्वरूपातील उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

प्रश्न - परगावहून येणाºया वाहनांच्या तपासणी केली जातेय का?
उत्तर - होय, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सहाही शहरांमधून गेलेल्या महामार्गांवर विविध ठिकाणी तपासणी नाक्यांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्याठिकाणी स्थिर सर्वेक्षण पथकाची नेमणूक करण्यात आली असून ये-जा करणाºया वाहनांची चोखपणे तपासणी केली जात आहे. त्याचा आढावा देखील नित्यनेम घेतला जात आहे.


 नियमांचा भंग करणाºयांवर कारवाई होईल का? 

प्रश्न -  विधानसभा निवडणूक रिंगणात उतरलेल्या सर्वच उमेदवारांनी तसेच निवडणूक खर्च संनियंत्रणासाठी गठीत करण्यात आलेल्या पथकांनी घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करावे. यासंदर्भात नियमबाह्य वर्तन करणाऱ्यांवर निश्चितपणे कारवाई केली जाईल.

Web Title: Special emphasis on monitoring the election expenses of candidates! - Narendra Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.