वाशिम जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना विशेष अधिकार प्रदान !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 02:28 PM2018-05-30T14:28:39+5:302018-05-30T14:28:39+5:30
वाशिम : जिल्ह्यात आगामी काळात साजरे होणारे सण, उत्सव शांततेत साजरे होण्याच्या दृष्टीने वाशिम जिल्ह्यातील सर्व फौजदार व त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाºयांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ नुसार १० जून ते २० जून २०१८ या कालावधीत विशेष अधिकार प्रदान करण्यात आले, अशी माहिती पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी दिली.
वाशिम : जिल्ह्यात आगामी काळात साजरे होणारे सण, उत्सव शांततेत साजरे होण्याच्या दृष्टीने वाशिम जिल्ह्यातील सर्व फौजदार व त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाºयांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ नुसार १० जून ते २० जून २०१८ या कालावधीत विशेष अधिकार प्रदान करण्यात आले, अशी माहिती पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी दिली.
आगामी सण व उत्सवाच्या कालावधीत जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवून शांतता राहावी यासाठी पोलीस विभागातर्फे नियोजन केले जात आहे. त्या अनुषंगाने पोलीस अधिकाºयांना विशेष अधिकार प्रदान करण्यात आले. मिरवणूक अथवा जमावातील लोकांना कशा रीतीने चालावे याचे निर्देश देणे, मिरवणुकीचा मार्ग व वेळ विहित करणे, मिरवणूक अथवा उपासनेच्यावेळी अडथळा होवू न देणे, रस्त्यावर व रस्त्यांमध्ये, घाटात किंवा घाटांवर, सार्वजनिक स्नानाच्या, कपडे धुण्याच्या व उतरण्याच्या जागांच्या ठिकाणी व जागांमध्ये, जत्रा, देऊळ आणि इतर सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखणे, सार्वजनिक ठिकाणी अथवा रस्त्यांवर गाणी, वाद्ये वाजविणे किंवा ध्वनीक्षेपकाचा उपयोग करण्याचे विनियमन करणे, त्यावर नियंत्रण ठेवणे तसेच सक्षम प्राधिकारी यांनी कलम ३३, ३५, ३७ ते ४०, ४२, ४३, व ४५ या अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधीन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देण्याचे अधिकार जिल्ह्यातील सर्व फौजदार व त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाºयांना १० जून ते २० जून २०१८ कालावधीत प्रदान करण्यात आले आहेत. तसेच या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३४ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असे पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविले.
२ जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखणे सुलभ होण्यासाठी २ जून २०१८ पर्यंत जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.