पोलीस अधिकार्यांना विशेष अधिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 01:15 AM2017-09-29T01:15:07+5:302017-09-29T01:15:16+5:30
वाशिम : ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात कायदा-सुव्यवस् था कायम राखण्याचा प्रयत्न म्हणून जिल्ह्यातील सर्व फौजदार व त्यापेक्षा वरिष्ठ अधिकार्यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ नुसार ३ ते १२ ऑक्टोबर २0१७ या कालावधीत विशेष अधिकार प्रदान करण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी बुधवारी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात कायदा-सुव्यवस् था कायम राखण्याचा प्रयत्न म्हणून जिल्ह्यातील सर्व फौजदार व त्यापेक्षा वरिष्ठ अधिकार्यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ नुसार ३ ते १२ ऑक्टोबर २0१७ या कालावधीत विशेष अधिकार प्रदान करण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी बुधवारी दिली.
नोव्हेंबर व डिसेंबर २0१७ मध्ये मुदत संपणार्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीमुळे जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. वाशिम जिल्ह्यातील एकूण २७३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीकरिता ७ ऑक्टोबर २0१७ रोजी मतदान होणार असून, ९ ऑक्टोबर २0१७ रोजी मतमोजणी होणार आहे. या काळात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व फौजदार व त्यापेक्षा वरिष्ठ अधिकार्यांना यादरम्यान विशेष अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. त्यानुसार मिरवणूक अ थवा जमावातील लोकांना कशा रीतीने चालावे, याचे निर्देश देणे, मिरवणुकीचा मार्ग व वेळ विहित करणे, मिरवणूक व जमावाच्या प्रसंगी व उपासनेच्या जागांच्या आसपास उपासनेच्या वेळी व कोणत्याही रस्त्यावरून किंवा सार्वजनिक जागा अथवा सार्वजनिक स्थळी गर्दी होणार असेल, अशा सर्व प्रसंगी अड थळा होऊ न देणे, सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखणे, सार्वजनिक ठिकाणी अथवा रस्त्यांवर किंवा सार्वजनिक जागेवर, जागेजवळ गाणी, वाद्य वाजविणे किंवा गाणे गाण्याचे, ढोल-ताशे व इतर वाद्य वाजविण्याचे आणि इतर कर्कश वाद्य वाजविण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे, कोण त्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी ध्वनिक्षेपकांचा उपयोग करण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे तसेच सक्षम प्राधिकारी यांनी कलम ३३, ३५, ३७ ते ४0, ४२, ४३, व ४५ या अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधीन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देण्याचे अधिकार जिल्ह्यातील सर्व फौजदार व त्यापेक्षा वरिष्ठ अधिकार्यांना ३ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर या कालावधीत प्रदान करण्यात आले आहेत. तसेच या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३४ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असे जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी सांगितले.