आयुष मंत्रालयाच्या योग तज्ज्ञ परीक्षेत वानखडे यांना विशेष मानांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:54 AM2021-02-27T04:54:58+5:302021-02-27T04:54:58+5:30

डॉ. वानखडे हे पतंजली योग पीठ हरिद्वारचे आजीव सदस्य आहेत. डॉ. वानखडे हे सन २००५ पासून योग क्षेत्रामध्ये कार्यरत ...

Special rating to Wankhade in Yoga Expert Examination of AYUSH Ministry | आयुष मंत्रालयाच्या योग तज्ज्ञ परीक्षेत वानखडे यांना विशेष मानांकन

आयुष मंत्रालयाच्या योग तज्ज्ञ परीक्षेत वानखडे यांना विशेष मानांकन

Next

डॉ. वानखडे हे पतंजली योग पीठ हरिद्वारचे आजीव सदस्य आहेत. डॉ. वानखडे हे सन २००५ पासून योग क्षेत्रामध्ये कार्यरत असून २००९ मध्ये त्यांनी पतंजली योग पीठातून स्वामी रामदेवबाबा यांच्या मार्गदर्शनात योग शिक्षकाचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. यासोबतच त्यांनी आपले संपूर्ण जीवन योग सेवेला वाहून घेतले आहे. जनतेचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी योग शिबिराच्या माध्यमातून त्यांचे योग सेवाकार्य सतत नि:शुल्क सुरू असून त्यांच्या मार्गदर्शनात अनेक योग शिक्षक घडले आहेत. याआधी आयुष मंत्रालयाच्यावतीने योग विषयावर घेण्यात आलेल्या वायसीबी लेवल १ आणि लेवल २ ह्या परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. यासोबतच विद्यापीठाची डिप्लोमा इन योग शिक्षक पदविका व नॅशनल स्किल्स क्वॉलिफिकेशन योगा इन्स्ट्रक्टर लेवल ४ ह्या परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत.

Web Title: Special rating to Wankhade in Yoga Expert Examination of AYUSH Ministry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.