अतीटंचाईग्रस्त गावांमधील टँकरच्या फेऱ्यांवर प्रशासनाचा विशेष ‘वॉच’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 01:55 PM2019-05-17T13:55:50+5:302019-05-17T13:56:04+5:30

शासनाने टँकरच्या फेऱ्यांवर आता विशेष ‘वॉच’ ठेवणे सुरू केले असून ‘जीपीएस’ यंत्रणाही पूर्ण ताकदीने सक्रीय करण्यात आली आहे.

Special 'Watch' on tanker rounds in villages! | अतीटंचाईग्रस्त गावांमधील टँकरच्या फेऱ्यांवर प्रशासनाचा विशेष ‘वॉच’!

अतीटंचाईग्रस्त गावांमधील टँकरच्या फेऱ्यांवर प्रशासनाचा विशेष ‘वॉच’!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये यंदा पाणीटंचाई निर्माण झाली असून अतीटंचाईग्रस्त गावांमध्ये जिल्हा प्रशासनाकडून पाणीपुरवठ्याकरिता टँकर सुरू करण्यात आले आहेत; मात्र ते बहुतांश गावांमध्ये पोहचतच नसल्याची बाब सर्वप्रथम ‘लोकमत’ने विविधांगी वृत्तांच्या माध्यमातून उजागर केली. त्याची दखल घेऊन प्रशासनाने टँकरच्या फेºयांवर आता विशेष ‘वॉच’ ठेवणे सुरू केले असून ‘जीपीएस’ यंत्रणाही पूर्ण ताकदीने सक्रीय करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील लघू व मध्यम अशा एकंदरित १३४ प्रकल्पांमध्ये आजमितीस उणापूरा ४ ते ५ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. शंभरावर धरणे कोरडी पडली असून विहिरी, हातपंप, कुपनलिका, गावतलाव आदी जलस्त्रोतांच्या पाणीपातळीनेही तळ गाठला आहे. दरम्यान, उद्भवलेली भीषण पाणीटंचाई लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाने प्राप्त झालेले मागण्यांचे प्रस्ताव निकाली काढत विहिर अधिग्रहण, विशेष नळ दुरूस्ती यासह काही अतीटंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू केला. मात्र, बहुतांश गावांमध्ये टँकरच्या फेºयाच होत नसल्याचे वास्तव ‘लोकमत’ विविधांगी वृत्तांच्या माध्यमातून उजागर केले. काही टँकरवर असलेली जीपीएस यंत्रणा अकार्यक्षम ठरत असल्याचेही प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. त्याची दखल घेत सर्वप्रथम सर्व टँकरचे जीपीएस लोकेशन ट्रॅक करून टँकरच्या नियमित कोणत्या गावात किती फेºया होतात, याकडे लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. सद्य:स्थितीत १६ गावांना टँकरने पाणीपुरवठा करणे सुरू असून यात गावांची संख्या आणखी वाढणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Special 'Watch' on tanker rounds in villages!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.