शासकीय महाविद्यालयासाठी तिसऱ्या दिवशीही  उपाेषण सुरू

By नंदकिशोर पाटील | Published: August 30, 2023 04:56 PM2023-08-30T16:56:19+5:302023-08-30T16:57:54+5:30

३० ऑगस्ट रोजी आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशीही प्रतिसाद मिळाला असून आमदार राजेंद्र पाटणी यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली.

Speech continues for the third day for the government college | शासकीय महाविद्यालयासाठी तिसऱ्या दिवशीही  उपाेषण सुरू

शासकीय महाविद्यालयासाठी तिसऱ्या दिवशीही  उपाेषण सुरू

googlenewsNext

वाशिम : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मानोरा तालुक्यात व्हावे या मागणीसाठी मानाेरा येथील तहसील कार्यालयावर २८ ऑगस्टपासून साखळी उपोषण सुरू आहे. ३० ऑगस्ट रोजी आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशीही प्रतिसाद मिळाला असून आमदार राजेंद्र पाटणी यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. तसेच दत्तराज डहाके, बळी राठोड,सुनील धाबेकर यांनी भेट दिली. आज ग्रामपंचायत गव्हा यांनी ठराव घेऊन पाठिंबा दिला.

रुई येथे स्वाक्षरी माेहीम
मंजूर झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मानोरा तालुक्यात व्हावे यासाठी रुई येथे आणि परिसरात हरिओम गावंडे यांनी स्वाक्षरी मोहीम राबविली. त्यांनी गावातील सुमारे एक हजार सह्यांचे निवेदन घेतले. मानाेरा येथे शासकीय महाविद्यालय व्हावे याकरिता अनेकजण आंदाेलन करुन प्रशासनाला निवेदन देत आहेत.
 

Web Title: Speech continues for the third day for the government college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.