जिल्हा वार्षिक योजनेचा निधी तत्काळ खर्च करा
By admin | Published: November 6, 2014 01:20 AM2014-11-06T01:20:59+5:302014-11-06T01:20:59+5:30
वाशिम जिल्हाधिका-यांचा आदेश : विकास कामांचा आढावा.
वाशिम : जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपयोजन व आदिवासी उपयोजना आदी योजनांमधून सन २0१४-१५ साठी विविध विकास कामे व योजनांसाठी प्राप्त झालेला निधी कोणत्याही परिस्थितीत नोव्हेंबर अखेरपयर्ंत खर्ची पाडावा, असे आदेश जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांनी दिले. या कालावधीत निधी खर्च न झाल्यास शिल्लक निधी परत घेण्याबाबत विचार करावा लागेल, असा इशाराही यावेळी जिल्हाधिकार्यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा वार्षिक योजना २0१४-१५ च्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीला जिल्हा नियोजन अधिकारी सु. ना. गवळी, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त एम.जी. वाठ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक वानखेडे, जिल्हा उपनिबंधक खाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के. डी. पाडेवार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी राजेश पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बालासाहेब बोराडे, जिल्हा प्रशासन अधिकारी प्रणाली घोंगे यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख व प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्हा वार्षिक नियोजन अंतर्गत मंजूर करण्यात आलेला व संबंधित कार्यालयांना प्राप्त झालेला निधी प्रस्तावित योजनांवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी सर्व प्रशासकीय विभागांनी प्राधान्य द्यावे. तसेच काही विभागांना निधी देण्यात येवूनही त्यांनी त्याचा खचार्ला प्रशासकीय मान्यता घेतलेली नाही. अशा विभागांनी १५ नोव्हेंबरपयर्ंत तातडीने खर्चाची मान्यता घेऊन निधी खर्च करण्याच्या दृष्टीने तत्काळ कार्यवाही करावी, अन्यथा या विभागांना देण्यात आलेला निधी परत घेण्याचा विचार करावा लागेल.