जिल्ह्यात आंतराष्ट्रीय योग दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:27 AM2021-06-22T04:27:11+5:302021-06-22T04:27:11+5:30
- सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय याेग दिन वाशिम : स्थानिक सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात सोमवार २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय ...
-
सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय याेग दिन
वाशिम : स्थानिक सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात सोमवार २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय वाशिम व मुक्तांगण यांच्या संयुक्त विद्यमाने योग अभ्यास करून योग दिनाचे पालन करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाची सुरूवात प्राचार्य डॉ. संजय चौधरी, एमसीव्हीसीचे प्रभारी प्राचार्य सुनील उज्जैनकर, योग शिक्षिका डॉ. शुभांगी दामले व रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. विजय पांडे यांचे हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात. आपल्या प्रास्ताविकात डॉ. विजय पांडे यांनी योगाचे महत्व विषद करून स्वयंप्रेरित नियमितपणे योगाचा अभ्यास करण्याचे आवाहन केले. तसेच नियमित योग हा कसा आपल्या विविध व्याधींवर परिणाम करतो ते उदाहरणांसह स्पष्ट केले. योग शिक्षिका डॉ. शुभांगी दामले यांनी विविध प्रकारचे आसने, प्राणायम, क्रिया इत्यादी प्रकार प्रात्यक्षिक व माहितीसह करवून घेतले. योग वर्गाची सांगता प्रार्थनेने झाली.
जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात
शाळा, महाविद्यालयांचा पुढाकार : विद्यार्थी, शिक्षकांचा सहभाग
वाशिम : जिल्ह्यात सोमवार २१ जून रोजी आंतराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळा, महाविद्यालयांनी यात पुढाकार घेतला, तर शिक्षक, विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. काही ठिकाणी कोरोना पार्श्वभूमीवर घरीच योगाचे धडे गिरवण्यात आले.
-
सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय
वाशिम : स्थानिक सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात सोमवार २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय वाशिम व मुक्तांगण यांच्या संयुक्त विद्यमाने योग अभ्यास करून योग दिनाचे पालन करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाची सुरूवात प्राचार्य डॉ. संजय चौधरी, एमसीव्हीसीचे प्रभारी प्राचार्य सुनील उज्जैनकर, योग शिक्षिका डॉ. शुभांगी दामले व रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. विजय पांडे यांचे हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात. आपल्या प्रास्ताविकात डॉ. विजय पांडे यांनी योगाचे महत्व विषद करून स्वयंप्रेरित नियमितपणे योगाचा अभ्यास करण्याचे आवाहन केले. तसेच नियमित योग हा कसा आपल्या विविध व्याधींवर परिणाम करतो ते उदाहरणसहित स्पष्ट केले. योग शिक्षिका डॉ. शुभांगी दामले यांनी विविध प्रकारचे आसने, प्राणायम, क्रिया इत्यादी प्रकार प्रात्यक्षिक व माहितीसह करवून घेतले. योग वर्गाची सांगता प्रार्थनेने झाली.