जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:27 AM2021-06-22T04:27:21+5:302021-06-22T04:27:21+5:30

यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अंबादास मानकर, प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकात उप्पलवार, योग केंद्राचे संचालक रामनारायण छापरवाल, लेखाधिकारी युसुफ शेख, ...

In the spirit of International Yoga Day in the district | जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

Next

यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अंबादास मानकर, प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकात उप्पलवार, योग केंद्राचे संचालक रामनारायण छापरवाल, लेखाधिकारी युसुफ शेख, योग अभ्यासिकेच्या पुष्पलता अफूने, गाईड जिल्हा संघटक प्रीती गोल्हेर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रत्यक्ष व ऑनलाइन स्वरूपात या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांना छापरवाल यांनी योग दिनाबद्दल शपथ दिली. यावेळी मानकर यांनी दैनंदिन जीवनामध्ये योगाचे महत्त्व व फायदे याविषयी मार्गदर्शन केले. तांगडे यांनी योग हा आपल्या जीवनाचा महत्त्वपूर्ण घटक असल्याचे सांगितले. त्यानंतर योग चिकित्सक तेजस्विनी माणिकराव, आर्ट ऑफ लिव्हिंगचे विजय चव्हाण, पतंजली युवा भारतीचे सहजिल्हाध्यक्ष आशिष जामकर यांनी आयुष मंत्रालयाने दिलेल्या प्रोटोकॉलनुसार योग प्रात्याक्षिके घेतली.

आंतरराष्ट्रीय योग दिन ऑनलाइन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा अधिकारी संजय पांडे, क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरशीकर, संतोष कनकावर, संतोष भेंडेकर, सूरज भड, भारत वैद्य, कलीम वेब मिर्झा, विनायक जवळकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन व आभार स्काऊटचे जिल्हा संघटक राजेश गावंडे यांनी मानले.

Web Title: In the spirit of International Yoga Day in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.